मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/9/2026 :

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी! आज घराघरांत आणि मंडळात लाडक्या श्रीगणेशाचे मंगल आगमन होणार! दरवर्षी दहा दिवसांचा हा लोकोत्सव (कधी अकरा, तर यंदा बारा दिवसांचा) आपण सर्व जण अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा करतो.

घरोघरी पार्थिव श्रीगणेशमूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होते. सार्वजनिक मंडळांतही गणरायाची भव्य प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा-अर्चा केली जाते; हे सर्व अत्यंत भक्तिभावाने व मनःपूर्वक केले जाते.

हा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व शिस्तीत पार पडावा, याची काळजी मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा व सजग सामाजिक कार्यकर्त्यांनी घेणे नितांत गरजेचे आहे. पर्यावरणपूरक आणि सुसंस्कृत वातावरणातच हा उत्सव साजरा केला गेला पाहिजे.

आजचा संकल्प

सध्या वादग्रस्त ठरलेले डीजे, डॉल्बी आणि धोकादायक लेझर यांसारख्या घातक गोष्टींशिवाय गणेशोत्सव साजरा करू; पोलीस यंत्रणेला पूर्ण सहकार्य करू आणि आबालवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या