⏹️ आरोग्यासाठी महत्त्वाचे

 ⏹️  आरोग्यासाठी महत्त्वाचे 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

१) बीपी : १२० / ८०

२) नाडी : ७०-१००

३) तापमान : ३६.८-३७

४) श्वास : १२-१६

५) हिमोग्लोबिन : 

पुरुष- १३.५०-१८; महिला- ११.५०-१६

६) कोलेस्टेरॉल : १३०-२००

७) पोटॅशियम : ३.५०-५

८) सोडियम : १३५-१४५

९) ट्रायग्लिसराइड्स : २२०

१०) रक्ताचे प्रमाण : PCV ३०-४०%

११) साखरेची पातळी : 

मुलांसाठी- ७०-१३०;  प्रौढांसाठी- ७०-११५

१२) लोह : ८-१५ मिग्रॅ

१३) पांढऱ्या रक्तपेशी WBC : ४०००-११०००

१४) प्लेटलेट्स : १,५०,०००-४,००,०००

१५) लाल रक्तपेशी RBC : ४.५०-६ दशलक्ष

१६) कॅल्शियम : ८.६-१०.३ mg/dL

१७) व्हिटॅमिन डी-3 : २०-५० एनजी/मिली

१८) व्हिटॅमिन बी-१२ : २००-९०० pg/ml

*ज्येष्ठांसाठी टिप्स*

१) तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्यावे. आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतांश शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात. दररोज किमान ३ लिटर पाणी प्यावे.

२) शरीराकडून जास्तीत जास्त काम करवून घ्या. शरीराची हालचाल झाली पाहिजे, जसे की- चालणे, पोहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळाने.

३) कमी खा. जास्त खाण्याची लालसा सोडून द्या. कारण ते कधीच चांगले नसते. स्वत:ला वंचित करू नका, परंतु प्रमाण कमी करा. प्रथिने, कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ जास्त वापरा.

४) अगदी आवश्यक असल्या शिवाय शक्यतो वाहन वापरू नका. तुम्ही कुठेही किराणा सामान घेण्यासाठी, कोणाला भेटायला किंवा काही कामासाठी जात असाल, तर पायी चालण्याचा प्रयत्न करा. लिफ्ट, एस्केलेटर वापरण्या ऐवजी पायऱ्या चढा.

५) राग सोडा, काळजी करणे थांबवा, गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्रासदायक परिस्थितीत स्वत:ला गुंतवू नका. ते सर्व आरोग्य खराब करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात. सकारात्मक लोकांशी बोला आणि त्यांचे ऐका.

६) सर्वप्रथम पैशाची आसक्ती सोडून द्या. तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधा, हसवा आणि बोला. पैसा जगण्यासाठी बनवला गेला आहे, पैशासाठी आयुष्य नाही.

७) स्वत:बद्दल किंवा तुम्ही जे साध्य करू शकले नाही अशा कोणत्याही गोष्टी बद्दल किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकत नाही, त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका. त्याकडे दुर्लक्ष करा आणि विसरा.

८) पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता, सौंदर्य, जात, प्रभाव या सगळ्या गोष्टी अहंकार  वाढवतात. नम्रता ही लोकांना प्रेमाने जवळ आणते.

९) जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही. ही एका चांगल्या जीवनाची सुरुवात आहे. आशावादी व्हा, स्मृतीसह जगा, प्रवास करा, आनंद घ्या, चांगल्या आठवणी निर्माण करा.

१०) लहान मुलांना प्रेमाने, सहानुभूतीने आणि आपुलकीने भेटा. काही उपहासात्मक बोलू नका, चेहऱ्यावर हसू ठेवा. भूतकाळात कितीही मोठे पद भूषवले असले तरी ते वर्तमानात विसरून जा आणि सर्वांशी मिळून मिसळून राहा.

संकलन : डॉ. नरेंद्र वानखडे 

MBBS, MS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या