रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहिगाव येथे पालक सभा संपन्न

रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहिगाव येथे पालक सभा संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 25/9/2026 :

दहिगाव येथे रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहिगाव या शाळेत गुरुवार दिनांक- २४ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे तसेच पालक आणि संस्थेमध्ये सुसंवाद वाढविण्याच्या उद्देशाने  पालक सभेचे आयोजन करण्यात आले.

या पालक सभेत विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती, शिस्त, नियमित अभ्यास तसेच विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी संस्थेशी नियमित संपर्क ठेवावा आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच  शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. पालकांनीही आपल्या सूचना व अडचणी मांडून संस्थेला सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. यावेळी प्रथम घटक चाचणी चे निकाल पालकांना दाखवण्यात आले व त्यावर सविस्तर चर्चा झाली.

पालक सभेमुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली. या सभेला रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर चे अध्यक्ष  अनंतलाल रतनचंद दोशी, रत्नत्रय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रणजीत पाटील, प्राचार्य गजेश जगताप, शिक्षक व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रचंलन व आभार शाळेचे शिक्षक हर्षल चिकणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या