विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/09/2026 :
सप्टेंबर महिना सुरू झाला की आपल्या शाळेत साजरा होणाऱ्या *'शिक्षक दिना'* चे सर्वांना वेध लागतात. आपले लाडके शिक्षक आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी सुंदर भाषणे आठवू लागतात.
आपल्या शिक्षकांची शिकवण्याची हातोटी, त्यांची कडक शिस्त, त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि समजून घेण्याची वृत्ती अशा कितीतरी गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर तरळू लागतात.
मुलांनो, काही शिक्षक आपल्याला खूपच शिस्तप्रिय व कठोर वाटतात. त्यांच्याविषयी मनात आदर असतो, पण तेवढीच भीतीही वाटते. त्यांच्या तासाची धडकी भरते आणि शिक्षेच्या भीतीने का होईना, वेळेवर अभ्यास पूर्ण करावा लागतो. कधी कधी अगदी "मारकुटे"ही म्हणतो आपण त्यांना; होय ना?
पण अशाच शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष शिक्षकांकडून आपले खरे व्यक्तिमत्त्व घडत असते; तेच आपल्या उज्ज्वल भविष्याचे खरे शिल्पकार असतात!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या