लक्स ची पहिली जाहिरात करणारी महानायिका : लीला चिटणीस

लक्स ची पहिली जाहिरात करणारी महानायिका  : लीला चिटणीस  

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/9/2026

वयाच्या १६ व्या वर्षी लग्न, ४ मुलं अन ३५० सिनेमे. लक्स ची पहिली जाहिरात करणारी महानायिका कोण? जाणून घेऊया या दिग्गज अभिनेत्रीची थक्क करणारी कहाणी. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळावर अधिराज्य गाजवणारी आणि 'लक्स' साबणाची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बेसेडर ठरलेली दिग्गज अभिनेत्री लीला चिटणीस. यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. 

अवघ्या १६ व्या वर्षी विवाहबंधनात अडकलेल्या, ४ मुलांची आई असलेल्या या धाडसी अभिनेत्रीने संसारातील वादळानंतर अभिनयाच्या बळावर तब्बल ३५० हून अधिक चित्रपटात अभिनयाचा डंका वाजवला. एका सामान्य कुटुंबातून येत भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या या अभिनेत्रीची जीवनगाथा आजही अनेकांसाठी मोठी प्रेरणा ठरते. त्या काळात जेव्हा स्त्रिया घराबाहेर पडण्यास संकोच करत होत्या, तेव्हा लीला चिटणीस यांनी ग्लॅमर विश्वात पदार्पण केले. 

'लक्स' साबणाची जाहिरात करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या; ज्यानंतर मधुबाला, वहिदा रहमान यांच्या सारख्या तारकांनी हा वारसा पुढे नेला. दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या तिन्ही महानायकांच्या पडद्यावरील 'आई' म्हणून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही अजरामर आहेत. लहान वयात लग्न, त्यानंतर चार मुलांची जबाबदारी सांभाळत त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि सिनेसृष्टीला दिलेले अमूल्य योगदान हे खरोखरीच आश्चर्य आहे.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या