श्री शिवपार्वती मंदिर शंकरनगर अकलूज येथे सोमवारी महाआरतीचे आयोजन

 

श्री शिवपार्वती मंदिर शंकरनगर अकलूज येथे सोमवारी महाआरतीचे आयोजन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 05/9/2026 :

शंकरनगर येथील महाशिवरात्री यात्रा समिती चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रावण मासाच्या समाप्ती निमित्त सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता शंकरनगर- अकलूज ता. माळशिरस येथील श्री शिवपार्वती मंदिरात महाआरतीचे आयोजन केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष  जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली. श्रावण महिन्यात शिवपार्वती मंदिरात अखंड नामजप सोहळा सुरू आहे. मंदिर परिसरात नेहमीच सर्वधर्मीय भाविकांची दर्शनास गर्दी असते. श्रावणाच्या दर सोमवारी मंदिरात रूद्राभिषेक, आरती, धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप केले जाते. भाविकांनी सहकुटुंब या महाआरती करिता उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टच्या सदस्या कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या