विकासाच्या श्रेया बाबत काँग्रेसचा मोठा आदर्श
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/9/2026 :
केरळमच्या कोट्टायम जिल्ह्यातील पुंजार विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर रोजी एका पुलाचे उद्घाटन झाले काँग्रेसचे विद्यमान आमदार ॲड. सेबास्टियन कुलतुंकल यांनी स्वतःच्या हातून पराभूत झालेले डावे आघाडीचे (LDF) माजी आमदार पी. सी. जॉर्ज यांना या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आणि दोघांनी मिळून संयुक्तपणे या पुलाचे उद्घाटन केले.!
आमदार सेबास्टियन यांनी पुलाच्या कोनशिलेवर स्वतःचे नाव न टाकता माजी आमदारांचे नाव कोरले. उद्घाटनावेळी बोलताना ते म्हणाले की माजी आमदार पी.सी.जॉर्ज यांनी त्यांच्या आमदार निधीतून या पुलासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला नसता तर आज हा पूल उभा राहिला नसता; त्यामुळे या पुलाचे खरे श्रेय त्यांचेच आहे.!
निवडणुकीतील पराभव आणि पक्षातील मतभेद बाजूला ठेवून विकासकामांचे श्रेय योग्य व्यक्तीला देण्याच्या या कृतीचे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.! ━═━═━═━═━═━═━═━═━═━═

0 टिप्पण्या