मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/9/2026
आपल्या घरातील मुलांना आपण नेहमी चार चांगल्या गोष्टी शिकवत असतो; जसे की नम्रपणे वागावे, शांत व हळू आवाजात बोलावे, मोठ्या माणसांशी आदराने वागावे वगैरे वगैरे.
पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेकदा जरा वेगळाच अनुभव येतो. काही मुले जोरजोरात ओरडत असतात. एखाद्या मोठ्या व्यक्तीने समजावून सांगितले तर उलट उत्तरे करतात, उर्मटपणे बोलतात किंवा वडीलधाऱ्यांची उघड खिल्ली उडवतात.
असे का घडते? संस्कार करण्यात आपण कुठे कमी पडतो का? की घरात अति कडक शिस्त असते म्हणून मुले बाहेर गेल्यावर अशी बेफाम वागतात? खरे तर सार्वजनिक ठिकाणी सभ्यता कशी बाळगावी, हासुद्धा संस्कारांचाच एक अविभाज्य भाग आहे. मुले नेहमी मोठ्यांचेच अनुकरण करतात; त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे हे नक्की!
आजचा संकल्प
आपल्या मित्रपरिवारात अथवा नातलगांमध्ये वावरताना आपण स्वतः अत्यंत जबाबदारीने बोलू व वागू; जेणेकरून मुलेही नकळत आपलेच चांगले अनुकरण करतील याची दक्षता घेऊ आणि पुढच्या पिढीला सुसंस्कृत बनवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या