विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/9/2026 :

आपण जेव्हा शाळेत जातो, तेव्हा तिथे उत्तम शिस्तीच्या दृष्टीने अनेक नियम असतात. शाळेत नेहमी वेळेवर उपस्थित राहणे, स्वच्छ व नीटनेटका गणवेश घालणे, वेळेत गृहपाठ पूर्ण करणे अशा विविध नियमांचे काटेकोर पालन करावे लागते; अन्यथा शिक्षा होते.

हे शिस्तीत वागण्याचे आणि नियम पाळण्याचे उत्तम वळण ज्यांना शालेय वयातच अंगी बाणवता येते, ते त्यांना आयुष्यभर अत्यंत उपयोगी पडते. मात्र शिक्षा झाली तरीही बेफिकीरपणे नियम मोडणारेही काही जण असतात.

मुलांनो, आज समाजातही आपल्याला हे दोन्ही प्रकारचे नागरिक पाहायला मिळतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नियम पाळणाऱ्यांपेक्षा ते सर्रास मोडणारेच लोक जास्त आढळतात. आपण नियम मोडतोय याची कोणतीही खंत किंवा अपराधी भाव मनात नसतोच; उलट त्यांचीच अरेरावी आणि गुर्मी जास्त पाहायला मिळते.

नियम उर्मटपणे मोडण्यात नव्हे, तर ते जबाबदारीने पाळण्यातच खरा सुसंस्कृतपणा असतो, हे सदैव लक्षात ठेवा!

 सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या