शंकरराव मोहिते महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/9/2026 :
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे 'सृजनरंग महोत्सव' अंतर्गत 'सहकार महर्षि करंडक' शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन तथा अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील विचार क्षमतेला चालना देण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन अशा विविध गटांतून एकूण ६२ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: गट क्रमांक १ (इयत्ता ५ वी ते ७ वी):
प्रथम: रोशनी हाके, द्वितीय: सृष्टी मगर, तृतीय: मेहरून मुलाणी चतुर्थ: इरिना पठाण.
गट क्रमांक २ (इयत्ता ८ वी ते १० वी): प्रथम: पूर्वा चव्हाण, द्वितीय: भूमिका मगर, तृतीय: संस्कृती दुपडे, चतुर्थ: राजनंदिनी गायकवाड.
गट क्रमांक ३ (इयत्ता ११ वी व महाविद्यालयीन गट): प्रथम: प्रेरणा गायकवाड, द्वितीय: संजीवनी शेंडगे, तृतीय: वैभवी नलावडे, चतुर्थ: संस्कार रणनवरे.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुनिता ठोंबरे, प्रा. भारत साठे, प्रा. रविंद्र माने-देशमुख, प्रा. नागन्नाथ साळवे, प्रा. सनी वर्दम व प्रा. श्रेया देशमुख यांनी केले. स्पर्धेचा निकाल वाचन सृजनरंग समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर, सीडीसी सदस्य डॉ. हणमंत आवताडे व सर्व मान्यवर परीक्षकांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व शिक्षक सहकाऱ्यांनी व शिक्षकेतर बंधू यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या