शोक कांगावा आणि स्वागत समारंभ

 

शोक कांगावा आणि स्वागत समारंभ  

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 7/9/2026 :

 आपण सर्वजणानी निकटवर्तीय व्यक्तीच्या मृत्यूचा अनुभव घेतलेला आहे 

एखाद्या घरात मृत्यू झाला नाही असे ठिकाण नाही 

मृत्यू झाल्यानंतर पहिले 13 14 दिवस सूतक असते विधी होतात व नंतर दुःख बाजूला ठेवून मनुष्य आपापल्या कामाला लागतो

 परंतु पुढे एक वर्ष होईपर्यंत त्या घरात सणवार साजरे केले जात नाहीत धार्मिक विधी होत नाहीत गणपती बसवला जात नाही दिवाळी साजरी होत नाही एक वर्षभर सामान्य माणूस हा आपल्या निकटवर्ती याच्या मृत्यूच्या दुःखामध्ये राहतो

 संस्कृत मध्ये तर याबद्दल एक अतिशय समर्पक सुभाषित आहे 

 पिता दुःखम् दिनत्रये

 माता दुःखम् ष्णमासे

 भार्या दुःखम् पूर्न भार्या

 क्षुधा दु:खम् दिने दिने 

 याचा अर्थ पित्याचे निधन झाल्यानंतर तीन दिवसापर्यंत मनुष्य शोकात राहतो व नंतर आपल्या दैनंदिन पोटापाण्याच्या कामाला लागतो आईचे दुःख मात्र त्याला सहा महिने आठवत रहाते पत्नीचे निधन झाल्यानंतर दुसरी पत्नी मिळेपर्यंत ते दुःख राहते व क्षुधा म्हणजे पोटाचे दुःख, पोटाची भूक ही कायम राहते.

याप्रमाणे आपल्या कोणत्याही निकटवर्तीया  मृत्यूनंतर एक वर्षभर लोकलाजेस्त लोक  आनंदी क्षण सण धार्मिक कार्यक्रम करत नाहीत अगदीच विवाहाचा प्रसंग आला तर नाईलाजाने व साधेपणाने कार्यक्रम पार पडतो.

 *सांत्वन की पिकनीक* 

 मला एकदा एका दूरच्या नात्यातील वृद्ध स्त्रीच्या मृत्यू घरी सांत्वन करण्यासाठी जावे लागले ते ठिकाण माझ्या शहरापासून आठ तासाच्या अंतरावर होते व रेल्वेने जावे लागत होते 

 मधील एका स्टेशनवर मयत झालेल्या वृद्ध स्त्रीची मुलगी राहत होती मुलगी म्हणजे साधारणपणे 35 ते 40 येथील महिला होती योगायोगाने रेल्वेने जाताना ती महिला माझ्या डब्याचा चढली.

 पूर्वीची ओळख असल्यामुळे बोलणे झाले व आईच्या मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेला आठदहा दिवस वेळ मिळाला नव्हता.

ती सांत्वनासाठी चालली होती रेल्वेमध्ये सुमारे चार सहा तास ती माझ्याबरोबर होती हसणे खिदळणे येईल तो पदार्थ विकत घेणे एखाद्या ट्रीपला चालल्यासारखे त्या महिलेचा वागणे होते

 *कांगावा की ढोंग* 

 रेल्वे स्टेशन आले तेथून खाजगी वाहनाने मी व ती महिला त्यांच्या गावी गेलो वाटेत सुद्धा त्या महिलेच्या चेहऱ्यावर अगर वागण्यामध्ये तिच्या आईच्या मृत्यूचा दुःखाचा लवलेश नव्हता

 जसे आमचे वाहन या माहेरी पोचले वाहनातच त्या महिलेने हंबरडा फोडण्यास सुरुवात केली व रडारड करून  सगळी गल्ली गोळा केली. गल्लीतील लोकांना कळेना आठ-दहा दिवसांपूर्वी एक मृत्यू झाला आज पुन्हा आज पुन्हा रडारड सुरू झाली आणखीन कोण गेले काय? 

 त्या महिलेचा शोक कांगावा पाहून मी अचंबित झालो

 *सप्त तारांकित विवाह* 

मी वर म्हटल्याप्रमाणे मृत्यूनंतर एक वर्ष त्या घरात देवधर्म होत नाही गणपती बसवला जात नाही धार्मिक कार्यक्रम होत नाहीत हे सर्वसामान्याना लागू आहे पण संकष्टी दिवशी चिकन खाणाऱ्या असामान्य लोकांना हे लागू नाही

 महाराष्ट्रातील एक महिला नेत्यानी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत माझा भाऊ गेला यांना सत्ता मिळाली माझ्या भावाच्या मृत्यूचे यांना काही नाही असा शोका आक्रोश त्यांनी केला

 पण माझ्या डोळ्यासमोर त्याच घरात दोन-चार महिन्यापूर्वी सप्त तारांकित विवाह समारंभ झाल्याचे आले सदर विवाह समारंभ  एके ठिकाणी झाला असला तरी त्याचे स्वागत समारंभ अनेक ठिकाणी जोरदारपणे झाले सिनेनट  राजकीय व सामाजिक व्यक्ती हजर होत्या आनंदाने मिठ्या मारल्या गेल्या त्यावेळी भावाची दुःख बाजूला ठेवण्यात आले होते काय ?

स्वागत समारंभात आनंदच आनंद चालला होता त्यावेळी हे दुःख बहुतेक बाहेर बसून राहिले असेल.

 ॲड.अनिल रुईकर 

98 232 55 049 इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या