गुळाचा गणपती

 


गुळाचा गणपती

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 6/9/2026 :

 महाराष्ट्राच लाडके व्यक्तिमत्व कै पु ल देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला व लिहिलेला एक चित्रपट 1953 साली प्रदर्शित झाला होता हा चित्रपट अर्थातच कृष्णधवल होता या चित्रपटात पु ल देशपांडे यांनी मुख्य भूमिका केली होती ती अशी होती एक नाऱ्या नावाचा किराणा दुकानात नोकर असणारा भोळसट  तरुण म्हणजे पु ल देशपांडे यांना काही धूर्त राजकारणी लोक हाताशी धरतात व नाऱ्याचा शंभुनाथ महाराज करतात व हा शंभुनाथ महाराज ठिकठिकाणी भाषणे करत व मेळावे घेत जनतेचे प्रश्न मांडत असतो त्याला पुढे करून हे धूर्त राजकारणी मोठा निधी गोळा करत असतात नाऱ्याला उपाशी घेऊन हे सर्वजण आलेल्या पैशात अय्याशी करत असतात

 त्यामुळे या चित्रपटाचे नाव गुळाचा गणपती असे ठेवले होते

 जिज्ञासूंनी youtube वर हा चित्रपट अवश्य पहावा 

1953 च्या पूर्वी पु ल देशपांडे यांना गुळाचा गणपती ही संकल्पना सुचली ते किती दूरदर्शी असावेत

 *युज ॲन्ड थ्रो* 

 2014 साला नंतर किंवा त्याआधी दोन-तीन वर्षे आपल्या देशात धूर्त राजकारणी लोकांनी असेच अनेक गुळाचे गणपती बसवले त्यांना पुढे करून आपले राजकारण आपल्या अर्थकारण करून घेतले.

 आपण आठवून पहा  दिल्लीच्या जंतर मंतर रोडवरील बारा साली झालेले आंदोलन त्यानंतर हार्दिक पटेल  मेवाणी कन्हैयालाल असे अनेक अनेकांना पुढे करून त्यांच्या नावे आंदोलने करून अनेक राजकीय 

धूर्त व्यक्तींनी आपले उखळ पांढरे करून घेतले आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पुऱ्या करून घेतल्या व वापरा आणि फेका या तत्त्वानुसार या गुळाच्या गणपतीचे आपोआपच विसर्जन झाले 

 *राजकीय दिवाळखोर* .

वाचक बंधू भगिनींनो हे राजकीय नेते असे गुळाचे गणपती समाजापुढे का आणत आहेत कारण समाजातील त्यांची व त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेलेली आहे त्यांच्या विश्वासार्हतेचेची दिवाळे वाजले आहे त्यामुळे ते दरवेळी नवा गुळाचा गणपती बसवत आहेत 

 *उपोषण आणी मेजवान्या* 

 या गुळाच्या गणपतीला वारंवार उपोषणाला बसवणे त्याच्या सभा व गर्दी आकर्षित करणे असे कार्य हे धूर्त राजकारणी करतात  गुळाच्या गणपती चित्रपटात नाऱ्याला उपाशी ठेवून हे राजकारणी आपण मात्र जोरदारपणे मेजवान्या झोडत होते 

चित्रपट फार वर्षापूर्वी पाहिला असल्यामुळे त्यातील नाऱ्या मला खायला देत नाहीत मला उपोषणाला बसवता व आप ठुस ठुसकर  खा रहे असे म्हटले आहे काय हे मला आज आठवत नाही पण एखाद्याला उपोषणाला बसवायचे व आपण मात्र पिझ्झा बर्गर बिर्याणी यावर आडवा हात मारायचा हे आपण नुकतेच पाहिले आहे

 *आणी माझा गुळाचा गणपती* *झाला* 

 वाचक बंधू भगिनींनो 

माझ्या आयुष्यात सुद्धा माझा सुद्धा एकदा गुळाचा गणपती करण्यात आला

 एका न्यायाधीशांच्या विरुद्ध संप करून मला पुढाकार देण्यात आला व ज्यांनी मला पुढे केले ते मात्र त्या आंदोलनातून केव्हा पसार झाले मला कळाले नाही मी संपाचा पुढारी झालो व या माझ्या धुर्त सहकारी यानी आपली कामे चालवून घेतली 

याचे दुष्परिणाम मला पुढे बारा वर्षे भोगावे लागले याबद्दल मी पुस्तक लिहिले आहे ते लवकरच प्रकाशित करणार आहे

 *गणपती एकच नावे अलग* *अलग* 

 गणपती एकच असतो मग त्याची नावे मात्र वेगळी असतात कधी तो लालबाग कधी सिद्धिविनायक असतो पण गणपती एकच असतो तसे गुळाचा गणपती एकच असतो त्याची नावे मात्र हजारे जिग्नेश हार्दिक वांगचुक अशी  वेगवेगळी असतात

 *राजकीय ऊखळ पांढरे* 

 महाराष्ट्रात पण असे अनेक भोळ्या भाबड्या व्यक्तीना पुढे करून त्यांच्या नावे आपले उखळ पांढरे करून घेणारी लोक आहेत त्या भोळ्या भाबड्या लोकांची नावे आपणास माहित आहेत व आपले राजकीय उखळ पांढरे करणारे यांची नावे आपणास माहित आहेतच

 *दूरदर्शी पु ल*  

आम्ही आज जे पाहतो आहोत ते पु ल देशपांडे यांनी 1953 साली पाहिले होते त्याची नक्कीच अपूर्वाई वाटत आहे.

ॲड. अनिल रुईकर 

98 232 550 49 

इचलकरंजी

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या