मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/9/2026 :
कोणत्याही गोष्टीवर केवळ कायद्याने बंधन घातले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मुळीच होत नाही. समाजात कायदा पाळण्यापेक्षा तो मोडण्यातच अनेकांना अवाजवी मोठेपणा वाटतो.
कायदा न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ही सर्वसामान्य, सुजाण नागरिकांची स्वाभाविक अपेक्षा असते; तर कायदा मोडूनही आपण कारवाईतून कसे सुटलो, ही शेखी मिरवणे ही कायदा मोडणाऱ्याची बेजबाबदार फुशारकी असते.
ज्या गोष्टी उघडपणे अयोग्य आणि सर्वांसाठी घातक आहेत, त्या तरीही करणारच हा अट्टाहास म्हणजे एक सामाजिक विकृती नव्हे काय? त्याचा त्रास सर्वांना म्हणजेच प्रत्यक्ष कायदा मोडणाऱ्याला आणि त्याच्याही निष्पाप कुटुंबीयांना होतो, याचे साधे भान त्यांना असू नये का?
आजचा संकल्प
मी समाजात वावरणारा एक सुसंस्कृत, जबाबदार नागरिक असल्याने समाजाचे अहित होईल असे कधीही वागणार नाही आणि कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी घालणार नाही.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या