विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/9/2026 : 

आपण वाईट वागू नये आणि वाईट बोलू नये, यासाठी आपले आई-वडील नेहमीच मनापासून प्रयत्नशील असतात. ते आपल्याला सतत चांगल्या गोष्टी सांगतात; रामायण-महाभारतातील बोधकथा आणि बाल शिवरायांच्या पराक्रमाच्या शौर्यकथा आवडीने ऐकवतात.

यामागील हेतू हाच असतो की, तुम्ही त्यांतून योग्य आदर्श घ्यावा आणि त्यांचे अनुकरण करावे. आई कधी देवबाप्पाची भीती घालते, तर कधी वडिलांचा धाक दाखवते; जेणेकरून भीतीने का होईना, तुम्ही वाईट वाटेला जाऊ नये.

मुलांनो, तुम्ही चांगले वागल्यावर तुमचे भरभरून कौतुक होते, खाऊ मिळतो आणि पाठीवर शाबासकीची थाप मिळते; ज्यामुळे तुम्हाला चांगल्या वर्तनाची नवी प्रेरणा मिळावी. आपले व्यक्तिमत्त्व घडताना जशी शिस्त आणि धाक आवश्यक असतो, तसेच कौतुक व प्रोत्साहनही महत्त्वाचे असते.

या सर्वांमध्ये सर्वांत मोलाचे असतात ते आपल्यावर होणारे सुसंस्कार; कारण त्यांतूनच आपले आदर्श व्यक्तिमत्त्व आकारास येते!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या