महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ अधिमंडळाची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ अधिमंडळाची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/9/2026 :

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबई या संस्थेची सन २०२५-२६ या वर्षाची अधिमंडळाची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (सोमवार दिनांक २८/०९/२०२६) रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाली.

        सदर सभा साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष प्रताप ओव्हाळ, बाळासाहेब पाटील, मा.आ.राजेश टोपे, जयप्रकाश साळुंके, कल्याणराव काळे, आबासाहेब पाटील, धनाजी साठे, विवेक कोल्हे, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ व इतर मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.

      या वार्षिक सर्वसाधारण सभेस सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर अकलूज या साखर कारखान्याच्या वतीने प्रतिनिधी म्हणून  स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील ह्या उपस्थित राहून त्यांनी आयत्या वेळच्या विषयात १) ऊसाची एफ.आर.पी. व साखर विक्रीची किंमत (एम.एस.पी.) लिंक करणे गरजेचे आहे व २) राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ऊसाचे एकरी उत्पादन घटणार असून सहकारी साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिटन अनुदान द्यावे अशी मागणी केली.

       सदर मागणीची अध्यक्ष महोदयांनी दखल घेऊन तसा ठराव करून शासनाकडे पाठविण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या