कर्करुग्णांसाठी व्हिगन डाएट खरेच फायद्याचे

 कर्करुग्णांसाठी व्हिगन डाएट खरेच फायद्याचे 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/9/2026 :

कर्करुग्णांसाठी औषधे, शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीबरोबरच आता उपचारांदरम्यान योग्य आहारावरही भर दिला जात आहे.

आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले, व्हिगन आहार पूर्णपणे शाकाहारी अन्न पदार्थांशी निगडित असतो. याही पुढे जाऊन या आहारात दुग्धजन्य पदार्थांबरोबरच दही, पनीर, चीज, बटर हेदेखील वगळण्यात येते. यामध्ये फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचे प्रमाण भरपूर असते. त्याचप्रमाणे प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी मोड आलेले कडधान्य यांचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो. फायटोकेमिकल आणि तंतूयुक्त अन्न पदार्थ शरीराला मोठ्या प्रमाणावर मिळावेत, यासाठी असा आहार महत्त्वाचा मानला जातो. या आहारात अन्नपदार्थ फारसे शिजवले जात नाहीत. जीवनसत्व बाराचा मुख्य स्रोत मांसाहार असून, या आहारात त्याची कमतरता रुग्णांना जाणवू शकते. त्यामुळे हा आहार घेणाऱ्यांना या जीवनसत्वाची ओषधे घ्यावी लागू शकतात.

या आहाराचा मुख्य उद्देश सांगताना आरोग्यतज्ज्ञ म्हणतात, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह यांसारख्या सहव्याधी असतील किंवा या व्याधी जडू नयेत यासाठी हा आहार उपयुक्त असतो, कारण या आहारात चरबी नसते. तसेच, शर्करेची मात्रा नाममात्र पातळीवर असते. त्यामुळे या महत्त्वाच्या सहव्याधीपासून कर्करुग्ण दूर राहण्याची शक्यता वाढते. या आहाराची विख्यात क्रीडापटूंनाही भुरळ पडत असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत.

*या आहाराविषयी तज्ञ काय म्हणतात ?*

ससून सर्वोपचार रुग्णालयातील जनरल फिजिशियन डॉक्टर सोनाली साळवी यांच्या मते, कर्करुग्णांसाठीचा व्हिगन आहार एका ठराविक पातळीपर्यंत ठीक असतो. मात्र, या आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ यासह मांस, अंडे यांचा समावेश नसल्याने यातून मिळणारी जीवनसत्व भरून काढण्यासाठी इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे हा आहार घेताना जीवनसत्वाची कमतरता शरीरात निर्माण तर होणार नाही ना, याविषयी रुग्णांना काळजी घ्यावी लागते.

तर कर्करोग तज्ञ डॉक्टर चकोर व्होरा यांनी यावर अधिक प्रकाश टाकला ते म्हणाले, कर्करुग्णांनी शुद्ध आणि शाकाहारी आहार घेणे आवश्यक आहे. व्हिगन आहार चांगला असला, तरी यावर पूर्ण संशोधन अद्याप झालेले नाही. ही आहार पद्धती कर्करुग्णांसाठी परिणामकारक असली, तरी या आजारावरील ही मुख्य आहार उपचारपद्धती मात्र नक्कीच नाही.

▣डॉक्टर सोनाली साळवी,

ससून सर्वोपचार रुग्णालयातील,

    जनरल फिजिशियन

▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या