⏹️ गुळ नि जिऱ्याचे पाणी

 ⏹️  गुळ नि जिऱ्याचे पाणी

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

◆ गूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो. या शिवाय ताप असेल तर जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने फायदा होतो.

◆ जिऱ्यात अनेक औषधी गुण असतात. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच आजारांशी लढण्यास मदत होते. 

◆ जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखी सारख्या समस्या दूर करण्यासाठी दररोज जिरे आणि गुळाचे पाणी प्यावे. 

◆ पाठदुखी अथवा कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर जिरे आणि गुळाचे पाणी फायदेशीर असते.

◆ पिरियड्स दरम्यान हार्मोन्स बदलामुळे महिलांना त्रास होतो. यावर गुळ आणि जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : आरोग्यम् धनसंपदा

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या