वेळप्रसंगी स्वतःला विकेन ;पण पैशांसाठी ‘छत्रपती’बंद पडू देणार नाही - पृथ्वीराज जाचक
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/9/2026 :
यंदाचा गळीत हंगाम सुरु करताना ‘अजितदादां’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मागील हंगाम केवळ अजितदादांसह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्यामुळे पार पडला.यंदा देखील अडचण आहे,मात्र,मुख्यमंत्र्यांसह, ‘सुनेत्रावहिनी’,‘दत्तामामा’आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. पैशाअभावी छत्रपती कारखाना बंद पडू दिला जाणार नाही, वेळप्रसंगी मी स्वतःला विकेन. मात्र छत्रपती बंद पडू देणार नाही, अशी भावनिक साद ‘छत्रपती’चे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सभासदांना घातली.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नंबर १ चा बॉयलर अग्नी प्रदीपन संचालक निलेश टिळेकर,व त्यांच्या पत्नी रश्मी टिळेकर यांच्या हस्ते तसेच युनिट नंबर २ बॉयलर अग्नी प्रदीपन संचालक संतोष मासाळ, व त्यांच्या पत्नी वैशाली मासाळ यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जाचक बोलत होते. जाचक पुढे म्हणाले, जिल्ह्यात पहिला बॉयलर अग्निप्रदिपन आपल्या कारखान्याचे होत आहे. ऊस तोडणी ऍडव्हान्स देणारा पहिला कारखाना आहे. याचा मनापासून आनंद आहे.यंदा १२.५९ लाख टन ऊस गाळप उद्दिष्ट आहे, सलग आठ वर्ष १२ लाखहून अधिक टन गाळप झाल्यानंतर कारखाना पूर्णपणे अडचणीतून बाहेर येईल.त्यासाठी कळकळीने सांगतो,सभासदांनो ऊसाचे टिपरु बाहेर जावून देवू नका,आपल्या ‘छत्रपती’चे वाडवडीलांनी उभा केलेले वैभव टिकले पाहिजे.आपले दिवस निश्चित बदलतील.‘वेळेत धन एक हजार किलोचाच एक टन आणि वजन रोख पैसे चोख हि आपली जमेची बाजू आहे.गाळपास येणारा ऊस आणि बाहेर जाणारी साखर एकाच वजनकाट्यावर मोजणारा ‘छत्रपती’ एकमेव आहे.माझ्या जन्मापासूनच वडील चेअरमन होते, त्यामुळे पदांचे,पैशांचे काही वाटत नाही.पण आपली संस्था टिकणे आणि चालणे महत्वाचे असल्याचे अध्यक्ष जाचक यांंनी सांगितले.
साखरेचे दर मध्यंतरी वाढल्यावर माध्यमांमध्ये त्याची मोठी चर्चा झाली.मात्र, वाढलेल्या साखरेच्या दराचा हिशोब पाहता प्रतिदिन अगदी किरकोळ खर्च वाढला असता.जो खर्च पिझ्झा बर्गर,सिनेमावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेने नगण्य आहे.पिकविणारे खाणाऱ्या पेक्षा कमी असले,तरी महत्वाचे असल्याचे अध्यक्ष पृथवीराज जाचक यांनी सांगितले.
0 टिप्पण्या