भीक मागणारे हात आता फुलांचा व्यवसाय करू लागले

 


भीक मागणारे हात आता

फुलांचा व्यवसाय करू लागले 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/9/2026 :

भीक मागणारे हात आता,

फुलांचा व्यवसाय करू लागले…

कालपर्यंत जे हात पसरले होते,

आज तेच हात स्वप्नं पेरू लागले…


फुलांच्या सुगंधात मिसळला,

घामाचा प्रत्येक थेंब,

कष्टांच्या मातीमधूनी उमलला,

इवलासा एक कोंब 


नको आहे भीक आता,

कष्टांनी दिले सन्मानाचे ताट 

फुलं विकताना त्या हातांनी,

जिंकली स्वतःचीच वाट…


हात तेच, माणसं तीच,

फक्त बदलली जीवनाची दिशा,

भीकेपासून व्यवसायापर्यंत,

हीच तर स्वाभिमानाची भाषा


आज हात पसरत नाहीत,

आज हात मेहनत करतात,

फुलांच्या प्रत्येक पाकळीतून,

आपल्या लेकरांची स्वप्नं जपतात…


आज त्यांच्या हातात फुलं आहेत,

डोळ्यांत उद्याची नवी पहाट,

भीकेपासून स्वाभिमानापर्यंत,

त्यांनीच घडवली स्वतःची वाट…


फुलं घेताना फक्त फुलं घ्यायची नाहीत 

त्या हातातला संघर्ष श्वासात भरून घ्यायचा 

कारण या फुलांच्या सुगंधामध्ये,

सुगंध फुललाय स्वाभिमानाचा....


डॉ. अभिजीत सोनवणे 

Doctor for BEGGARS 

9822267357

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या