श्री हरितालिका पूजन व्रत माहीती व कथा.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/9/2026 :
भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी श्री हरितालिका व्रत केले जाते.
**श्री हरितालिका व्रत हे माता श्री पार्वतीच्या तपश्चर्येचे व्रत आहे.*
श्री गणेश चतुर्थीच्या आपल्या दिवशी किंवा त्यादिवशी महाराष्ट्रातील सुवासिनी आणी मुली श्री हरितालिकेचे कडक व्रत करतात.
श्री शिवपार्वतीची पूजा,दिसंबर निर्जली उपवास आणि रात्री जागरण अशा या व्रतामागे श्री पार्वतीने श्री शिवप्राप्तीसाठी केलेल्या घोर तपश्चर्येची कथा आहे.
सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर कुमारिका मनासारखा चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात.
श्री हरितालिका व्रत हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला श्री हरितालिका व्रत केले जाते.दुसर्याच दिवशी श्री गणेश चतुर्थी कहते.म्हणून श्री हरि तालिका व्रत म्हणजे श्री गणेश उत्सवाची पूर्वसंध्या च.
*(कधीकधी काहीवर्षी श्री हरितालिका व्रत आणि श्री गणेश चतुर्थी से एकाच दिवशी येतात.*)
हे श्री हरितालिका व्रत प्रामुख्याने महिलांचे आहे. सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संसारसुखासाठी तर कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात.श्री पार्वतीने ज्या निष्ठेने श्री शिवाची आराधना केली त्या निष्ठेचे स्मरण म्हणून हे व्रत केले जाते.
श्री हरितालिका अर्थ आणि कथा ----(हरिता म्हणजे हरण केलेली किंवा नेलेली आणि आलिका म्हणजे सखी.)
सखींनी जिला हरण करून नेले थी हरितालिका.यावरूनच हरितालिका हे नाव प्रचलित झाले आहे.
कथा---हिमालयाने पार्वतीचा विवाह श्री विष्णुंशी ठरवण्याचे मनात आणले,पण पार्वतीने मनोमन श्री शिवालाच वरले होते. तेव्हा तिच्या सख्यांनी तिला अरण्यात नेले.तिथे पार्वतीने वाळूचे शिवलिंग तयार करून घोर तपश्चर्या केली आणि अखेर तिला शिव प्रसन्न होऊन तिचा पत्नी म्हणून स्विकार केला.हा प्रसंग भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशीचा.म्हणून या तिथीला हे व्रत केले जाते असे कथेत सांगितले आहे.
*श्री हरितालिका पूजा विधि*
श्री हरितालिका पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे वाळूच्या किंवा मातीच्या मूर्ती.वाळू किंवा शुद्ध मातीपासून श्री गणपती, शिवलिंग तसेच माता पार्वती आणि सखीच्या छोट्या मूर्ती करून त्यांची स्थापना केली जाते.श्री पार्वतीने वाळूचे शिवलिंग तयार करून पूजले होते त्याचेच से स्मरण.
श्री हरितालिका पूजेमध्ये श्री गणपती पूजन,कलश, घंटा,दीपपूजन, श्री महादेव, श्री पार्वती व सखीचे अभिषेक व पूजन झाल्यावर पूजेमध्ये विविध झाडांची पत्री,फुले आणि फळे वाहिली जातात.
हळद,कुंकू व सौभाग्य वाण अर्पण करून श्री हरितालिकेची कथा पठण आणि श्रवण होते सायंकाली आरती करून रात्री भजन,खेळ आणि गाणी म्हणून जागरण केले जाते.
श्री हरितालिका व्रताचा उपवास कडक मानला जातो.पारंपारिक पद्धतीनुसार तो निर्जली म्हणजे पाणीही न घेता केला जातो.श्री हरितालिका पूजेच्या दिवशी दिवसभर अन्नपाणी न घेता दुसर्या दिवशी सकाळी श्री हरितालिकेचे पंचोपचारे पूजन व आरती करून श्री हरितालिकेला दहीभात तसेच दूधसाखरेचा नेवैद्य दाखवून पूजा विसर्जन करून झाल्यावर उपवास सोडला जातो.
अर्थात हे व्रत शरीराला त्रास देण्यासाठी नसून मनाच्या निश्चयेसाठी असते.आजारपण, गर्भवती महिला किंवा प्रकृती साथ देत नसेल तर फळे,पाणी घेऊन हे व्रत करण्याची सवलत परंपरेनेच सांगितली आहे.श्रद्धा आणि भाव महत्वपूर्ण आहे.
हरितालिकेच्या रात्री जागरण करण्याची प्रथा आहे.महिला एकत्र जमून भजन,फुगड्या,जिम्मा,गाणी यात रात्र घालवतात.श्री पार्वती ने श्री शिवलिंगाचे पूजन करून रात्रभर श्री शिवाची आराधना केली होती,त्याचे हे स्मरण म्हणून हे व्रत आणि जागरण केले जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी पूजलेल्या मूर्तींची पूजा आणि आरती करून दहीभात आणि दूधसाखरेचा नेवैद्य दाखवून त्यांचे विसर्जन केले जाते.वाहत्या पाण्यात किंवा घरच्या घरी पाण्यात विसर्जन करून ते पाणी झाडांना घालण्याची पर्यावरण पूरक पद्धतही आता रूढ झाली आहे.
श्री हरितालिका पूजा विसर्जन करून झाल्यावर उपवास सोडला जातो.
श्री हरितालिका, श्री महादेव श्री पार्वती माता व सख्या आपल्या सर्वांचे कल्याण करो आणि आपणा सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभों हीच प्रार्थना! *━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═*
0 टिप्पण्या