लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर यांचे अल्पशा आजाराने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/9/2026 :
पारंपारिक लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. 1993 साली सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लावणी स्पर्धेच्या पहिल्या वर्षीच्या त्या पहिल्या विजेत्या होत्या त्याना उत्कृष्ट नृत्यांगनाचाही पुरस्कार मिळाला होता. पुढे त्यांना लावणी कलावंताला देण्यात येणारा सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकॅडमी चा लावणी कलावंत पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्राप्त झाला होता. तसेच महाराष्ट्र शासनाने ही त्यांचा लावणी ज्येष्ठ लावणी कलावंत कलावंत म्हणून पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
शकुंतला नगरकर या थोर पारंपारिक लावणीच्या जाणकार कलाकार होत्या त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात मोठी हानी झाली आहे अशा शब्दात भावना व्यक्त करत जयसिंह मोहिते पाटील यांनी ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील व जयंती समारंभ समितीचे सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

0 टिप्पण्या