विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/9/2026

काल हरतालिका व गणेशचतुर्थी या दोन्ही तिथी एकाच दिवशी होत्या. आज भाद्रपद शुद्ध पंचमी, म्हणजेच ऋषिपंचमी! महिला या दिवशी विशेष उपवास करतात; हा उपवास नेहमीच्या उपवासापेक्षा बराच वेगळा असतो.

आपल्या संस्कृतीत अनेक धार्मिक श्रद्धा व संकेत आहेत, त्यांपैकी ही एक जुनी परंपरा आहे. ऋषिपंचमीच्या उपवासाला बैलांच्या श्रमाने पिकवलेले अन्नधान्य, भाजीपाला किंवा फळे खाल्ली जात नाहीत. पूर्वी शेतीची संपूर्ण मशागत बैलच करत असत; त्यामुळे या दिवशी उपवासाला नेमके काय खावे, असा मोठा पेच निर्माण व्हायचा आणि केवळ कंदमुळे किंवा रानभाज्याच खाल्ल्या जायच्या.

मुलांनो, आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सर्वत्र शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने होतात. त्यामुळे पूर्वी हे व्रत जितके कठीण वाटायचे, ते आता तितके राहिलेले नाही.

थोडक्यात काय तर, काळानुसार जीवनशैली आणि जुन्या प्रथा कशा बदलत जातात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या