⏹️ कांदा खाण्याचे फायदे

 ⏹️  कांदा खाण्याचे फायदे

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/9/2026 :

अस्थमावर काही जणांना घरगुती उपाय जाणून घ्यायचे असतात. अशात जाणून घेऊया लाल कांद्याचा फायदा कसा होतो.

◆ लाल कांद्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्वे असतात. त्यात फ्लेवेनॉएड्स आणि एंथोसियानिंस हे तत्व असतात. त्या शिवाय लाल कांद्यात जवळपास २५ प्रकारचे एंथोसियानिंस तत्व असतात.

◆ फ्लेवेनॉएड्सने युक्त असल्याने यात रक्ताला नैसर्गिक रूपाने पातळ करण्याचा गुण असतो. लाल कांद्यात फायटोकेमिकल्स सुद्धा असते ज्याने इम्यून सिस्टीम मजबूत होते.

◆ लाल कांद्यात व्हिटॅमिन-के, बी-६ आणि सी भरपूर प्रमाणात असते. तसेच यात फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. त्यासोबतच यात खनिज पदार्थ, फोलेट, थियामिन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, मॅगनीज असतात. 

◆ लाल कांद्यातील अनेक तत्वांमुळे जसे की, थिओसल्फेट, क्यूसरसेटिन आणि एंथोसियानिन सियानिडिन असते. हे तत्व अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात असते आणि यानेच लाल कांदा अस्थमावर फायदेशीर ठरतो. 


सौजन्य : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या