श्रावणात महिनाभर कांदा बंद केला तर काय होतं? शरीराच्या आत घडणारे ‘हे’ बदल पाहून डॉक्टरही थक्क

श्रावणात महिनाभर कांदा बंद केला तर काय होतं? शरीराच्या आत घडणारे ‘हे’ बदल पाहून डॉक्टरही  थक्क

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/9/2026 :

_Stop Eating Onion for a Month: श्रावण सुरू होताच अनेकजण धार्मिक परंपरेनुसार महिनाभर कांदा-लसूण खाणं टाळतात. पण, रोजच्या आहारातून कांदा अचानक बंद केला तर शरीरावर नेमका काय परिणाम होतो? पचनापासून रोगप्रतिकारशक्तीपर्यंत काय बदल होतात, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत._

*What Happens if You Stop Eating Onion:* श्रावण महिना सुरू झाला की अनेकांच्या आहारातही बदल होतो. धार्मिक श्रद्धा आणि परंपरेनुसार या महिन्यात अनेक जण कांदा-लसूण खाणे टाळतात. रोजच्या भाजीपासून कोशिंबिरीपर्यंत जवळपास प्रत्येक पदार्थाची चव वाढवणारा कांदा अचानक आहारातून बाजूला होतो. मात्र, यामुळे शरीरावर नेमका काय परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? महिनाभर कांदा न खाल्ल्यास शरीराला त्याची कमतरता जाणवते का, की आरोग्यावर फारसा फरक पडत नाही? याच प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांनी दिले आहे.

कांदा हा आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. घरच्या साध्या जेवणापासून ते बर्गर, नूडल्स, चाट आणि विविध तळलेल्या पदार्थांपर्यंत कांद्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याची चव आणि सुगंध पदार्थाची लज्जत वाढवतात. मात्र, कांदा केवळ चव वाढवणारा पदार्थ नसून त्यामध्ये काही महत्त्वाचे पोषक घटकही आढळतात.

*कांदा म्हणजे पोषक घटकांचा खजिना*

कांद्यामध्ये जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ब-६, फोलेट, तंतुमय पदार्थ आणि विविध ॲंटीऑक्सिडंट घटक आढळतात. हे घटक शरीरातील विविध प्रक्रियांना हातभार लावतात. जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक यंत्रणेच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहे, तर जीवनसत्त्व बी-६ आणि फोलेट शरीरातील चयापचय आणि पेशींच्या निर्मितीसाठी संबंधित प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात. 

कांद्यामध्ये क्वेर्सेटिनसारखे वनस्पतीजन्य घटकही असतात. या घटकांमध्ये ॲंटीऑक्सिडंट आणि दाह कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म आढळतात, त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून कांद्याचे सेवन आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 

मग श्रावणात महिनाभर कांदा टाळल्यास काय होईल?

हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या निरोगी व्यक्तीने एक महिना कांदा खाल्ला नाही म्हणून शरीरावर मोठे किंवा गंभीर दुष्परिणाम होतीलच असे नाही. कारण कांद्यामधून मिळणारे पोषक घटक इतर अनेक भाज्या, फळे, कडधान्ये आणि खाद्यपदार्थांमधूनही मिळू शकतात.‌

मात्र, कांदा हा तंतुमय पदार्थांचा एक स्त्रोत असल्यामुळे तो पूर्णपणे बंद केल्यावर आणि त्याची जागा इतर तंतुमय पदार्थांनी भरुन न काढल्यास काही लोकांच्या पचनावर परिणाम जाणवू शकतो. आहारातील तंतू कमी झाल्यास बध्दकोष्ठता, पोट साफ न होणे किंवा पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवण्याची शक्यता असते, म्हणूनच श्रावणात कांदा टाळत असाल, तर भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि इतर तंतुमय पदार्थांचा आहारात योग्य समावेश करणे महत्त्वाचे आहे. 

*शरीरातील दाह कमी करण्यासही मदत*

कांद्यामध्ये क्वेसैटिनसारखे ॲंटीऑक्सिडंट घटक असतात. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दाहाशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम करु शकतात, त्यामुळे कांदा आहारातून पूर्णपणे काढून टाकल्यास या विशिष्ट वनस्पतीजन्य घटकांचे सेवन कमी होईल. 

मात्र, याचा अर्थ असा नाही की महिनाभर कांदा न खाल्ल्याने शरीरात लगेच दाह वाढेल किंवा एखादा आजार निर्माण होईल. आहारात इतर रंगीबेरंगी भाज्या, फळे, कडधान्ये आणि पौष्टिक पदार्थ असतील तर विविध ॲंटीऑक्सिडंट घटक शरीराला मिळत राहतात. 

*काही लोकांना कांदा टाळल्याने उलट फायदा होऊ शकतो*

कांदा प्रत्येकासाठी सारखाच फायदेशीर असेल असे नाही. काही लोकांना कांदा खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस, आम्लपित्त किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. विशेषतः संवेदनशील पचनसंस्था असलेल्या व्यक्तींना कांदा त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे अशा व्यक्तींनी कांदा टाळल्यास उलट पचनाशी संबंधित काही तक्रारी कमी झाल्याचे जाणवू शकते. मात्र, वारंवार किंवा तीव्र त्रास होत असल्यास केवळ कांदा बंद करण्याऐवजी डाॅक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. 

*श्रावणात कांदा टाळत असाल तर ही काळजी घ्या*

श्रावणात धार्मिक वैयक्तिक कारणामुळे कांदा आहारातून वगळत असाल तर त्याऐवजी पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. भरपूर भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी, संपूर्ण धान्ये, सुका मेवा आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समतोल ठेवा. 

थोडक्यात, महिनाभर कांदा न खाल्ल्याने शरीराचे आरोग्य अचानक बिघडते असे नाही.‌ कांद्यामधील पोषक घटक इतर पदार्थांमधून मिळवता येतात, त्यामुळे श्रावणात परंपरेनुसार कांदा करण्याची गरज नाही; फक्त तुमचा संपूर्ण आहार पौष्टिक आणि संतुलित असते महत्त्वाचे आहे. 

संकलन  : यशवंत वाघ

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या