बहुभाषिक राष्ट्रात भाषा आधारित करिअरच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध : सूरज माने
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/9/2026 :
हिंदी दिवस सप्ताहाची सांगता बक्षीस वितरण समारंभाने
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शंकरराव मोहिते महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने दि. १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हिंदी दिवस सप्ताहांतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा बाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये एकूण २५५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा स्टाफ सीलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, आयबीपीएस, आयुर्विमा कंपन्या, सीमा सुरक्षा दल, इंडियन पोस्ट इत्यादी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांवर आधारीत सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा (माध्यम हिंदी) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी आजच्या आधुनिक टॅलेंटच्या युगात आपल्यातील सुप्त गुणांची ओळख व्हावी व भाषिक कौशल्यांच्या आधारे आपले करिअर निर्माण करता यावे या उद्देशाने शेरो-शायरी प्रस्तुतीकरण स्पर्धा, फिल्मी डायलॉग प्रस्तुतीकरण स्पर्धा, जाहिरात प्रस्तुतीकरण स्पर्धा, हिंदी जोक्स प्रस्तुतीकरण स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पोस्टर प्रदर्शन स्पर्धेसाठी १.देश के विकास में युवा शक्ति का दायित्व २.सायबर सुरक्षा एवं उपाय ३.राष्ट्रभाषा हिंदी का महत्व ४.आर्टिफिसीयल इंटेलिजेंस (AI) लाभ और हानि हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.
दि.२१ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस समारंभ व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे सूरज माने, (बैंक अधिकारी, बैंक ऑफ इंडिया,माळेवाडी-अकलूज) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर हे उपस्थित होते.
सूरज माने यांनी विद्यार्थ्यांना, '२१ व्या शतकात हिंदीतील रोजगार' या विषयावर मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये अवगत करून रोजगार प्राप्त करता येतो असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना नव-नवीन करिअरच्या उपलब्ध संधीं बाबत सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुस्कान सय्यद, तमन्ना तिकोटे, शिवमंगल कश्यप, दिव्या गिरी, महादेव वाघमोडे, मेघा बडे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
हिंदी दिवस सप्ताहांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकास गोल्ड मेडल व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकास सिल्वर मेडल व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकास ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या सर्व स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे -
*सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा* -
प्रथम क्रमांक - ओंकार संतोष खरे - बी.ए.१
द्वितीय क्रमांक (विभागून) - कन्हैया लहू सूगावकर - बी.ए.१, एकता सचिन राजमाने बी.ए.१
तृतीय क्रमांक (विभागून) - शिवमंगल जोगेश्वर कश्यप - बी.ए.२, हिना राजू शेख - बी.ए.३, सिद्धी कुंडलिक किर्ते - बी.ए.१
*शेरो-शायरी प्रस्तुतीकरण स्पर्धा*
प्रथम क्रमांक - मुस्कान अन्वर सय्यद - बी.ए.३
द्वितीय क्रमांक - शिवमंगल जोगेश्वर कश्यप - बी.ए.२
तृतीय क्रमांक - मेघा संतोष बडे - बी.ए.३
*फिल्मी डायलॉग प्रस्तुतीकरण स्पर्धा*
प्रथम क्रमांक - साहिल शहाजी भिवरकर - बी.ए.३
द्वितीय क्रमांक - गौरी विज्ञान लोंढे - बी.ए.३
तृतीय क्रमांक - यश महेश सुरवसे - बी.ए.३
*जाहिरात प्रस्तुतीकरण स्पर्धा*
प्रथम क्रमांक - संध्या सत्यवान गायकवाड - बी.ए.३
द्वितीय क्रमांक - दिव्या अशोक गिरी - बी.ए.३
तृतीय क्रमांक - विश्वराज अमरसिंह मोहिते - बी.ए.१
*हिंदी जोक्स प्रस्तुतीकरण स्पर्धा*
प्रथम क्रमांक - वर्षा संतोष फराडे - बी.ए.२
द्वितीय क्रमांक - सिद्धी कुंडलिक किर्ते - बी.ए.१
तृतीय क्रमांक - विश्वराज अमरसिंह मोहिते - बी.ए.१
*पोस्टर प्रदर्शन स्पर्धा*
प्रथम क्रमांक - अमृता अनिल दुधाळ - बी.ए.२
द्वितीय क्रमांक - सायली सुनील दुधाळ - बी.ए.२
तृतीय क्रमांक (विभागून) - प्रीती तानाजी कांबळे - बी.ए.३, सृष्टी गणेश शेलार - बी.ए.२
या सर्व स्पर्धांसाठी डॉ.विश्वनाथ आवड, डॉ.संजय वाघमारे, डॉ.दत्तात्रय पाटील, डॉ.अण्णासाहेब नलवडे, डॉ.विजयकुमार शिंदे, डॉ.उत्तम वाघमोडे, प्रा.विनायक माने, प्रा.धिरज गुरव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
हिंदी दिवस समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या व प्राचार्यांचे शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे निकाल वाचन हिंदी विभाग प्रमुख डॉ.निवृत्ती लोखंडे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी लोंढे हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यश सुरवसे याने केले. प्रमुख पाहुण्यांच्या परिचय जिया शेख हिने करुन दिला. कार्यक्रमाचे आभार संध्या गायकवाड हिने मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजन-नियोजनासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.सयाजीराजे मोहिते-पाटील व सर्व समिती सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा.दादासाहेब कोकाटे, प्रा.रणजीत लवटे डॉ.पल्लवी मिसाळ, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार राजेंद्र बमणे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

0 टिप्पण्या