एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी, हडपसर, पुणे आणि उमेद ग्रामसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज मध्ये मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न

एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी, हडपसर, पुणे आणि उमेद  ग्रामसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने

अकलूज मध्ये मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/9/2026 : एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी, हडपसर, पुणे आणि उमेद  ग्रामसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक नऊ च्या नगरसेविका सौ. प्रतिभा विलासनंद गायकवाड यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबीर गुरुवार दिनांक 24/9/2026 रोजी जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा, (21 खोल्या) महर्षि कॉलनी अकलूज येथे मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले आणि सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संस्थापक संपादक अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता) आणि नगरसेविका सौ. नम्रता राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.



अकलूज नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. रेश्मा लालासाहेब आडगळे, गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिर उद्घाटन प्रसंगी नेत्र तपासणी तज्ञ अविनाश बाबुराव आडके, कॅम्प ऑर्गनायझर रमेश केंगार, नगरसेविका सौ नम्रता राहुल जगताप, आयोजिका नगरसेविका प्रतिभा विलासनंद गायकवाड, नगरसेविका मनीषा मोहन तिकोटे, नगरसेविका मंदाकिनी संजय पाडोळे, व्यवस्थापिका सौ. कामिनी सतीश ताटे देशमुख, लेखापाल आरती काशीद, गणेश वाघमारे, सहयोगिनी सपना पोरे, नीता शिंदे, जयमाला सगर, दिलशाद तांबोळी, अनिल साठे, सुरज गायकवाड, केंद्रप्रमुख सुरज कांबळे मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले, श्रीकांत राऊत, दत्तात्रय पंढरीनाथ गायकवाड, वृत्त एकसताचे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड, आरोग्य सेविका अश्विनी मुरलीधर बाबर भोसले, आरोग्य सेवक सचिन जाधव, आशा वर्कर सुरवसे, मधुकर सुतार, इत्यादी मान्यवरांसह शिबिरार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान झाला. सूत्रसंचालन दत्तात्रय पंढरीनाथ गायकवाड यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या