दालचिनी ! फक्त मसाला नाही, आरोग्यासाठीही गुणकारी! सर्दी, घशाच्या त्रासासह ६ समस्यांवर ठरू शकतो फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितले फायदे
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/9/2026 :
_Health Benefits of Cinnamon : सांधेदुखी आणि सूज यांसारख्या समस्यांमध्येही दालचिनी उपयुक्त ठरू शकते._
*Health Benefits of Cinnamon :* दालचिनी हा केवळ भारतीय खाद्यसंस्कृतीत पदार्थांची चव व सुगंध वाढवण्यासाठी वापरला जाणारा एक मसाला नाही, तर शतकानुशतके पारंपरिक औषधोपचारातही तिचा वापर केला जात आहे. तिच्यातील अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक (अँटी-इन्फ्लेमेटरी) गुणधर्मांमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पारंपरिक औषधोपचार व प्राथमिक वैज्ञानिक अभ्यासानुसार, टाईप २ मधुमेह, गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या पचनाच्या समस्या, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, तसेच सर्दी आणि श्वसनमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. याशिवाय, सांधेदुखी आणि सूज यांसारख्या समस्यांमध्येही दालचिनी उपयुक्त ठरू शकते. काही खेळाडू स्नायू व सांध्यांतील अस्वस्थता कमी करण्यासाठी तिचा पूरक आहाराचा भाग म्हणून वापर करतात.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर दीपक कुमार (वैद्य) यांच्या मते, दालचिनी हा असा मसाला आहे जो अनेकजण जेवण, चहा किंवा दुधात घालून खातात. दालचिनीला “मसाल्यांची राणी” असेही म्हटले जाते. कारण तिचा सुगंध, चव आणि आरोग्यासाठीचे फायदे खूप आहेत. तिचे फक्त दोन-तीनच नव्हे, तर असंख्य आरोग्यदायी गुण आहेत, त्यामुळे आयुर्वेदातही तिला विशेष महत्त्व दिले जाते. तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल, तर दालचिनीचा एक तुकडा चावा. दालचिनी चोळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि दात व हिरड्यांच्या समस्यांवरही मदत होते. दालचिनीचा सुगंध आणि त्यातील काही नैसर्गिक घटक तोंडाची दुर्गंधी तात्पुरती कमी करु शकतात. चला, एका तज्ञाककडून जाणून घेऊया की दालचिनी शरीरावर कसा परिणाम करते.
*पचनविकार*
हवामानातील बदलांमुळे किंवा दूषित अन्नामुळे होणाऱ्या अतिसारासाठी पाण्यासोबत १ ते २ ग्रॅम दालचिनी पावडरचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकते. शिवाय, ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठीही दालचिनी चे सेवन प्रभावी आहे.
*मधुमेह आणि इन्सुलिन संवेदनशीलता*
दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि इन्सुलिन संवेदनशिलतेवरही परिणाम होतो. दालचिनीमध्ये असलेले पाॅलीफेनाॅल नावाचे संयुग इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करु शकते. पण, मधुमेहासाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांना पर्याय म्हणून दालचिनीचा विचार करु नये.
*कोलेस्ट्रॉल आणि हृदय*
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, दालचिनी हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. ती रक्तदाब आणि कोलेस्ट्राॅल-संबंधीत समस्यांमध्ये मदत करु शकते. तिच्या सेवनाने खराब कोलेस्ट्राॅल नियंत्रित करण्यास मदत होते. हा मसाला ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्राॅल वाढविण्यात मदत करतो. धमन्यांमधील कोलेस्ट्राॅलचे साठे नियंत्रित करण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरु शकते.
*संधीवात आणि सांध्यांच्या सुजेसाठी उपयुक्त*
दारचिनीमध्ये दाहशामक गुणधर्म असलेले नैसर्गिक घटक असतात. संधिवात आणि सांध्यांच्या सुजेसाठी ती उपयुक्त मानली जाते. सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांना दालचिनीच्या सेवनाने फायदा होऊ शकतो.
*वजन*
दालचिनी वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी मानली जाते. ती चयापचय क्रिया वाढवणे आणि कॅलरी जाळणे. संतुलित आहार, पुरेशी शारीरिक हालचाल आणि कॅलरी नियंत्रण करण्यासाठी या मसाल्याचे सेवन केल्यासारखे वजन लवकर नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते.
*सर्दी आणि घशाचा त्रास*
दालचिनीमध्ये ॲंटीऑक्सिडंट आणि ॲंटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. तुळस, आले, दालचिनी आणि मधासोबत तिचे सेवन केल्यास सर्दी आणि घशाच्या त्रासावर ती प्रभावी ठरते. दालचिनीचा तुकडा किंवा पावडर चोखल्याने घशाला आराम मिळू शकतो. पण, विषाणूजन्य किंवा जिवाणूजन्य संसर्गावर तो इलाज नाही.
*ॲंटीऑक्सिडंट*
दालचिनीमध्ये ॲंटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले अनेक नैसर्गिक घटक असतात. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी संबंधीत शरीराच्या यंत्रणेवर परिणाम करु शकतात. चहाबरोबर दालचिनीचे सेवन करणे किंवा तिचा काढा वापरणे प्रभावी ठरू शकते.
*दालचिनीचे सेवन कसे आणि किती प्रमाणात करावे?*
आरोग्यासाठी दररोज १ ते २ ग्रॅम दालचिनीचे सेवन करणे पुरेसे आहे. पण, योग्य प्रमाण व्यक्तीचे वय, आरोग्य आणि सेवनाच्या पध्दतीवर अवलंबून असते. जास्त प्रमाणात दालचिनी चे सेवन केल्यावर काही लोकांना तोंडात किंवा पोटात जळजळ जाणवू शकते. दीर्घकाळासाठी जास्त प्रमाणात सेवन करण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संकलन : यशवंत वाघ
************************

0 टिप्पण्या