🟣 सदाशिवराव माने विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
🟢 बुद्धिबळात दोन खेळाडू प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी निवड; कुस्तीतही उल्लेखनीय कामगिरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/9/2026 : सोलापूर येथे दि. २२ व २३ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सदाशिवराव माने विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध तालुके व भागांतून सहभागी झालेल्या खेळाडूंवर मात करत विद्यालयाच्या दोन खेळाडूंनी आपल्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. १४ वर्षे वयोगटात विनय रणसुभे, तर १९ वर्षे वयोगटात तेजश्री चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
दरम्यान, खुडूस येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेतही विद्यालयाच्या राजवीर मोरे याने १४ वर्ष वयोगटातून प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच कु. ज्ञानेश्वरी दगडे हिने ४९ किलो वजनगटात द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी खेळाडूंना सहशिक्षिका प्रभावती लंगोटे, क्रीडा शिक्षक उमेश भिंगे, भीमाशंकर पाटील, भीमराव दुधाळ व संजय राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयात यशस्वी खेळाडूंचा मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेळाडूंच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल शि.प्र. मंडळ अकलूज संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, विद्यालयाचे सभापती चि. सयाजीराजे मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव अभिजित रनवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, शिक्षक प्रतिनिधी सुजित कांबळे, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन करीत विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या