⏹️ महिलांची कंबरदुखी

 ⏹️  महिलांची कंबरदुखी

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

देशातील गृहिणींना आयुष्यात एकदातरी कंबर दुखीचा त्रासाला सामोरे जावे लागते. वेळीच उपाय न केल्यास आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागतो. घरकामात नेहमी खाली वाकणे, तसेच जॉब साठी सतत खुर्चीवर बसून काम करणे इत्यादी कारणाने महिलांना व युवतींना कंबर दुखीचा त्रास होतो. दररोज व्यायाम करणे, सकाळी थोडे फिरण्यास जाणे, नियमित योगासने व सोबत संतुलित आहार घेण्यासोबत खालील उपायांनी कंबरदुखी च्या त्रासावर मात करू शकता.

◆ रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेका.

◆ रोज १ चमचा सुंठवडा खाल्याने फरक पडतो.

◆ मोहरीचे तेल किंवा खोबऱ्याचे तेल यात लसूण घालून ते उकळावे व त्या तेलाने मालिश करावी.

◆ आहारात खनिजे, जीवनसत्व असणे आवश्यक आहे, म्हणजे कबरेची झीज भरून निघेल व कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर सज्ज राहील.

◆ योगासने केल्याने देखील कंबरदुखी वर खूप फरक पडतो. चक्रासन हे आसन नियमित केल्याने जुन्या कंबरेच्या तक्रारी दूर होतात.

◆ जेवण झाल्यावर किंवा सहज म्हणून जवस चावून खावे, कंबरदुखी व गुडघेदुखी ला फरक पडतो.

◆ पांढरे तीळ खाल्याने हाडे मजबूत होतात व कंबरदुखी थांबण्यासाठी मदत होते.

◆ तिळाच्या तेलाने मालिश करा, फरक पडेल.

◆ पित्ताचा त्रास नसेल, तर रोज एक चमचा मेथी दाणे पावडर दोन कप पाण्यात उकळून ते पाणी एक कप झाल्यावर दिवसातून चार वेळा घेणे.

◆ चमचा भर महासुदर्शन चुर्ण चमचाभर दूधात तीन वेळा घ्या, वरती गरमपाणी प्यावे.

संकलन : अनिल साखरकर==================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या