ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील किती वर्ष ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/9/2026 :
आता ब्रह्मदेवाच्या एक दिवसाचा हिशोब आईन्स्टाईनच्या कालसापेक्षता सिद्धांत शी जुळतोय का हे
आपल्या वेद, स्मृति, पुराणानुसार चा हिशोब करून पाहूया.
*१) आधी १ चतुर्युग किती ?*
- सत्ययुग - १७,२८,००० वर्ष
- त्रेतायुग - १२,९६,००० वर्ष
- द्वापारयुग - ८,६४,००० वर्ष
- कलियुग - ४,३२,००० वर्ष
*= एकूण १ चतुर्युग = ४३,२०,००० (४३.२ लाख) वर्ष*
*२) ब्रह्मदेवाचा १ दिवस:*
*१,००० चतुर्युग = ब्रह्मदेवाचा १ दिवस*
म्हणजे ४३,२०,००० x १००० = *४,३२,००,००,००० (४ अब्ज ३२ कोटी) वर्ष*
हा फक्त दिवस झाला. तेवढीच रात्र असते.
म्हणजे *दिवस + रात्र = ८ अब्ज ६४ कोटी वर्ष = ब्रह्मदेवाचा १ पूर्ण दिवस-रात्र.*
*३) मग ब्रह्मदेवाचे १ वर्ष आणि आयुष्य ?*
- ब्रह्मदेवाचे १ वर्ष = ३६० दिवस-रात्र = ३११० अब्ज वर्ष
- ब्रह्मदेवाचे १०० वर्ष आयुष्य = *३,११,०४० अब्ज वर्ष = ३११ ट्रिलियन वर्ष*
यालाच *एक परार्ध* म्हणतात. सध्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यातील ५१ वे वर्ष चालू आहे.
*४) आत्ता आपण कुठे आहोत ?*
सध्या ब्रह्मदेवाच्या दिवसातील -
- ७ वा मन्वंतर (वैवस्वत मनू) चालू आहे
- त्यातील २८ व्या चतुर्युगातील कलियुग चालू आहे
- कलियुगाची फक्त ५१२७ वर्षे झाली आहेत (इ.स. २०२६ पर्यंत)
म्हणून वैज्ञानिक आज पृथ्वीचे वय ४.५ अब्ज वर्ष सांगतात, जे बरोबर ब्रह्मदेवाच्या १ दिवसाच्या जवळपास आहे - हे आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे.
पण गेल्या हजारो वर्षात इंग्रजांसह अनेक परकीय घुसखोरांमुळे येथील लोकांमध्ये असलेली आपल्या संस्कृतीचा अभिमान कमी झाला आणि हीन भावनाच वाढली .
आज आधुनिक शास्त्रज्ञांनी लावलेल्या अनेक शोधांचा संदर्भ सनातनच्या ऋषीमुनी हजारो वर्षापूर्वी आधीच विविध ग्रंथ रूपाने सांगून ठेवलेले आहे .
आता ब्रह्मदेवाच्या एक दिवसाचा हिशोब आईन्स्टाईनच्या कालसापेक्षता सिद्धांत शी जुळतोय हे सनातन संस्कृतीशी द्वेष भावना असणाऱ्याला कसे पचेल ? आणि ज्याला सनातन धर्माशी प्रेम आहे त्याला आधुनिक शिक्षणाच्या नावाने याबाबत अज्ञानी ठेवला गेला आहे आणि या बाबत हीन भावना निर्माण केली गेली आहे . मग षड्यंत्राची कल्पना करा .
विकास चव्हाण
98 22 596 594
स्वयंपूर्ण वैदिक जीवनशैली सातारा.
0 टिप्पण्या