संपूर्ण जिल्ह्यात तात्कळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा; शिवप्रसाद कुंडलीक गोरेंची मागणी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/9/2026 :
गेले दीड ते दोन महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दांडी मारली आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे शेतातील उभ पीक जळून खाक झालं. बळीराजांनी रात्रीचा दिवस करून कर्ज काढून शेतात बी बियाणे पेरली तो आज डोळ्यादेखत आपल्या पिकाची राख रांगोळी होताना बघत, उघड्यावर पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण सावली पसरली असून शेतकरी अत्यंत चिंतेत सापडला आहे अशा अत्यंत बिकट परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी व पिकाचे पंचनामे करणे व कर्जमाफी देणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य असायला हवे होते. परंतु संतापजनक आणि संवेदनशील बाब म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आढावा घेण्यासाठी आयोजीत केलेल्या शाशकीय बैठकीत सत्ताधारी नेते, मंत्री
आणि अधिकारी मात्र एसी हॉल मध्ये बसून काजू बदाम खाण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा थेंबही नाही आणि पीकं करपून खाक झाली आहेत आणि सरकारचा दुष्काळ समीक्षा बैठकीत मात्र ड्रायफूडचा आढावा जोरात चालू आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे, त्याची चेष्टा करणारा हा प्रकार आहे. दुष्काळग्रस्त आढावा बैठका या केवळ कागदावर घोडे नाचवणेसाठी आणि आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठीच आहेत का? इकडे बळीराजा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही यशवंत सेना संघटनेच्या वतीने या ढोंगी,बधीर, असंवेदनशील कारभाराचा तीव्र निषेध करत आहोत.
केवळ बैठकीत देखावे करून शेतकऱ्यांची दिशाभूल करणे तात्काळ बंद करा जर शासनाला खरोखर बळीराजाची चिंता असेल तर खालील प्रमाणे मागण्यांची अंमलबजावणी करावी.
संपूर्ण जिल्ह्यात तात्कळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सर्व बाधीत पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी आणि कृषी पंपाचा खंडित केलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडावेत.
दुष्काळ आढावा बैठकीत नुसता देखावा न करता ठोस अंमलबजावणी त्वरित सुरू करावी जर सरकारने असंवेदनशील कारभारात सुधारणा नाही केली आणि शेतकऱ्यांना तातडीन मदत नाही मिळाली यशवंत सेना संघटना गप बसणार नाही.
सत्ताधाऱ्याचे उधळपट्टी विरोधात आणि बळीराजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल. असा इषारा यशवंत सेना (विद्यार्थी) बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद कुंडलीक गोरे यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या