रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात?

 

रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/9/2026

_Turmeric Milk Benefits At Night : जर तुम्हीसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पित असाल, तर यामुळे शरीराला नक्की कोणते फायदे होतात हे जाणून घेणे गरजेचे आहे._

*Turmeric Milk Benefits At Night :* तुमच्यापैकी अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पित असतील. आयुर्वेदातही हळदीचे दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. पण हे दूध रात्रीच पिण्याचा सल्ला का दिला जातो, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिणे का फायदेशीर ठरते आणि ते पिण्याची योग्य पद्धत काय आहे, याबद्दल प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

*गाढ आणि उत्तम झोपेसाठी फायदेशीर*

डॉ. शुभम वत्स यांच्या मते, हळद आणि दुधाचे मिश्रण चांगल्या झोपेसाठी खूप उपयुक्त ठरते. अनेकदा जास्त ताणतणावामुळे झोप न येण्याची समस्या वाढते. अशा वेळी हळदीचे दूध प्यायल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. हळदीमधील ‘करक्युमिन’ (Curcumin) आणि दुधातील ‘अमीनो ॲसिड’ एकत्र येऊन झोपेची गुणवत्ता वाढवतात. जेव्हा तुम्ही कोमट हळदीचे दूध पिता, तेव्हा त्यातील ‘ट्रिप्टोफॅन’ (Tryptophan) मेंदूपर्यंत पोहोचून ‘मेलाटोनिन’ आणि ‘सेरोटोनिन’ हे संप्रेरक (हार्मोन) तयार करण्यास मदत करते. मेलाटोनिन हे शरीराच्या झोपेचे चक्र नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टम) शांत होते आणि गाढ झोप लागते. 

*तणाव होतो कमी*

हळदीचे दूध प्यायल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मेंदूला शांती मिळते. हळदीत असलेले करक्युमिन मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे चिंतेची पातळी कमी होते, मेंदूला आराम मिळतो आणि शांत झोप लागते. 

*हळदीचे दूध पिण्याचे इतर महत्वाचे फायदे*

रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिल्याने लिव्हर डिटाॅक्सिफाय होते (शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात). तसेच दूध आणि हळदीचे मिश्रण तुमची पचनशक्ती सुधारते. हळदीच्या दुधात असलेले दाहक-विरोधी (ॲंटी-इन्फ्लॅमेटरी) गुणधर्म हाडांचा कडकपणा दूर करतात आणि स्नायूंना मजबूत बनवतात. संधिवात किंवा वाढत्या वयानुसार होणाऱ्या हाडांच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे दूध अत्यंत उपयुक्त ठरते. 

संकलन  : यशवंत वाघ

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या