विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/9/2026

आपले सार्वजनिक सणवार सुरू झाले की सर्वत्र अफाट गर्दी उसळते. विशेषतः गणेशोत्सव म्हटले की दररोज रात्री आकर्षक देखावे पाहण्यासाठी रस्ते गर्दीने फुलून जातात. देवदर्शन आणि सोबत देखाव्यांचे दर्शन हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. त्या गर्दीत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे व खेळण्यांचे विक्रेतेही असतात.

या दिवसांत रस्त्यांना जणू भव्य जत्रेचे रूप येते; विसर्जनाच्या दिवशी तर गर्दीचा उच्चांक असतो! अशा वेळी गर्दीमध्ये सर्व प्रकारचे म्हणजेच 'हौशे, नवशे आणि गवशे' लोक सामील झालेले असतात. काही जण निखळ आनंद लुटतात, तर काही समाजकंटक हातचलाखीने खिसे कापणे किंवा दागिने लांबवण्याचे गैरकृत्य करतात.

मुलांनो, अशा टवाळखोरांवर आणि चोरांवर बारीक नजर ठेवण्याचे अत्यंत कठीण काम आपले पोलीस दल अहोरात्र करत असते. त्यांना सलग बंदोबस्तावर तैनात केले जाते; त्यामुळे ना त्यांना घरच्या बाप्पाची आरती करता येते, ना आपल्या मुलाबाळांसोबत सणाचा आनंद घेता येतो! कर्तव्यदक्ष महिला पोलीस जेव्हा रस्त्यावर बंदोबस्ताला असतात, तेव्हा त्यांच्या घरचा सण कसा होत असेल?

या त्यागाची जाणीव आपल्याला आहे का? त्यांच्यासाठी नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी असू शकते, बरोबर ना?

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या