सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/9/2026
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलुज या कारखान्याचा ६५ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याच्या संचालिका कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील, अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक चि.सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे आजी व माजी संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याच्या संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी गळीत हंगामाच्या दृष्टीने कारखान्याचा आढावा घेऊन पाऊसाची परिस्थिती, पाण्याची कमतरता, साखरेच्या एम.एस.पी. मध्ये वाढ करणे अत्यंत गरजेचे असून त्याबाबत सरकारला विनंती केली असून *नीरा उजवा कालव्यास समांतर पाईप लाईन* करणेबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून सदर प्रकल्पास गती देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना विनंती केली.
गाळप हंगाम २०२५-२०२६ करीता कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑफ शुगर फॅक्टरी लि.नवी दिल्ली या देशपातळीवरील संस्थेकडून "राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार अंतर्गत सर्वोकृष्ट सहकारी साखर कारखाना ऊस विकास उच्च उतारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार" प्राप्त झाला असून सभासद, कामगार व व्यवस्थापनाचे अभिनंदन करुन कौतुक केले.
श्री सत्यानारायण महापुजा संचालक विराज प्रकाश निंबाळकर व त्याच्या सुविद्य पत्नी सौ. विशाखा विराज निंबाळकर या उभयतांचे हस्ते संपन्न झाली. या गळीत हंगामासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास द्यावा असे आवाहन केले.

0 टिप्पण्या