⏹️ गूळ नि गरम पाणी

 ⏹️  गूळ नि गरम पाणी

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

सकाळी तोंड न धुता गरम पाणी आणि गूळ घेणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पाणी प्यायलाने शरीरात बरीच शक्ती येते. असे केल्यानं, शरीरातून अनेक रोग निघून जातील, त्यामुळे आरोग्य देखील चांगले राहिल.

*वजन कमी करण्यास* : गुळात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 1, बी 6 आणि व्हिटॅमिन-सी आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी जाळण्यास मदत करतं, जेणे करून वाढलेले पोट कमी होऊन वाढते वजन कमी होईल. यासाठी रात्री दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी पिऊन घ्यावे.

*पोटाशी निगडित समस्या* : जर गॅसच्या त्रासामुळे त्रस्त असाल तर दररोज झोपण्या पूर्वी दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी प्यावे. असे केल्यानं गॅस, बद्धकोष्ठता सारखे त्रास नाहीसे होतात. जर सकाळी पोट स्वच्छ न होण्याचा त्रासाने वेढलेले असाल तर या उपायाचा अवलंब करावा.

*अनिद्राचा त्रास* : जर रात्री व्यवस्थित झोप येत नाही किंवा अस्वस्थता जाणवते, तर गरम पाण्यासह गुळाचे एक किंवा दोन तुकडे खावे. गुळात असणारे अँटी डिप्रेसेंट गुणधर्म ताणतणाव दूर करण्यास आणि झोप यायला मदत करतात. 

*तोंडाचे आजार* : दररोज रात्री वेलची आणि गूळ खाऊन गरम पाणी प्यायल्याने तोंडातील सर्व जंतांचा नायनाट होतो. असे केल्यानं दातांच्या कॅव्हिटी सारख्या समस्या दूर होतात आणि तोंडातील दुर्गंधीचा त्रास देखील संपतो. गरम पाणी आणि गूळ घेतल्यानं हिरडे देखील निरोगी राहतात.

*पथरीची समस्या* : जर पथरीच्या त्रासाने त्रस्त असाल दर रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी एक तुकडा गुळाचा खाऊन गरमपाणी पिऊन घ्यावे. असे केल्यास पथरी किंवा मुतखडा गळून लघवी वाटे बाहेर पडेल. त्याच बरोबर गूळ खाल्ल्याने छाती मधील जळजळ आणि सांधेदुखी देखील दूर होतात.

*त्वचेला चमक* : जर चेहऱ्याच्या टोन किंवा मुरुमांपासून त्रासलेले असल्यास काही दिवस अनोश्यापोटी गूळ आणि पाणी घ्यावे. यामुळे आरोग्य सुधारेल आणि त्यासोबत त्वचे मध्ये देखील तजेलपणा येईल.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : वेब दुनिया

===================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या