🍀 रानभाजी - शेंडवेल 🍀

 

🍀  रानभाजी - शेंडवेल  🍀 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 7/9/2026 :

शेंडवेल (सेंडवेल) ही आदिवासी भागात आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात आढळणारी पौष्टिक रानभाजी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात, डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर ही वेलवर्गीय वनस्पती उगवते. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून तिच्या कोवळ्या पानांची, शेंड्यांची आणि कोंबांची भाजी केली जाते. ही भाजी चवीला थोडीशी तुरट किंवा चवदार असते. पारंपरिक पद्धतीने बनवल्यास ती खूप चविष्ट लागते. या भाजीत फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ती पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या शरीरातील वात आणि कफ दोष संतुलित ठेवण्यास मदत करतात.

*भाजी बनवण्याची पद्धत* : शेंडवेलची कोवळी पाने आणि शेंडे स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. कढईत तेल गरम करून त्यात लसूण, कांदा, हिरवी मिरची किंवा तिखट घालून फोडणी द्यावी. काही वेळेस चव वाढवण्यासाठी आणि भाजीचा तुरटपणा कमी करण्यासाठी यात भिजवलेली चणा डाळ किंवा मूग डाळ घातली जाते. ही भाजी वाफेवर शिजवून गरमागरम भाकरी सोबत खावी.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या