दहिगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन, विद्यार्थी, शिक्षक व गुणवंतांचा गौरव; स्वागत समारंभासह विविध उपक्रम उत्साहात

दहिगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन, विद्यार्थी, शिक्षक व गुणवंतांचा गौरव; स्वागत समारंभासह विविध उपक्रम उत्साहात

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/9/2026 :

 रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री प्रायमरी स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमी दहिगाव येथे दिनांक.०५ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली. समितीचे अध्यक्षपदी रणजीत पाटील, उपाध्यक्षपदी सौ. प्राजक्ता अभिजीत चिकणे व सचिव पदी प्राचार्य गजेश जगताप यांची निवड झाली.

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संस्थेचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी, विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिगावचे चेअरमन अमित  गांधी तसेच सर्व पालकांच्या संगनमताने निवड करण्यात आली. 

याप्रसंगी श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर दहिगाव संचलित विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिगाव येथील नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयटीआयचे शिक्षक अमित नाळे, प्राचार्य  गजेश जगताप व सचिव प्रमोद दोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “शिक्षण आपल्याला ज्ञान देते, तर कौशल्य त्या ज्ञानाचा उपयोग करून यश मिळवण्याची क्षमता देते.” तसेच संस्थेचा व संस्थेच्या शिक्षकांचा पूर्णपणे उपयोग करून आपण आपले, आपल्या पालकांचे व आपल्या संस्थेचे नाव मोठे करावे असे प्रमोद दोशी  म्हणाले. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा संस्थेने सन्मान केला.

यावेळी तालुक्यात प्रथम आलेला विद्यार्थी प्रतीक संजय इंगळे या विद्यार्थ्याचा मान्यवरांनी सन्मान केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  हर्षल चिकने  यांनी केले व आभार प्रदर्शन सहशिक्षिका सौ. रूपाली रायते  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या