केंद्रीय जलसंसाधन समितीच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान समितीचे सदस्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सहभाग
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/09/2026 :
केंद्रीय जलसंसाधन समितीच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान समितीचे सदस्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील चर्चेत तसेच क्षेत्रभेटीत सहभाग घेतला.
या दौऱ्यात जल जीवन मिशनची अंमलबजावणी, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता व देखभाल, भूजल व्यवस्थापन तसेच Waste to Wealth या संकल्पनेअंतर्गत तंत्रज्ञानाधारित शाश्वत कचरा व्यवस्थापन यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी कबिनी धरणाची पाहणी करून धरणाची सुरक्षितता, जलाशयातील पाण्याचे एकात्मिक व्यवस्थापन, पूर नियंत्रण, आधुनिक स्वयंचलित नियंत्रण व निरीक्षण प्रणालीचा वापर, आपत्कालीन परिस्थितीतील व्यवस्थापन तसेच धरण सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांवर केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
तसेच धरणातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी कार्यक्षमतेने पोहोचविणे, कालवा व सिंचन व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि उपलब्ध जलसंपत्तीचा शाश्वत पद्धतीने उपयोग करणे याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

0 टिप्पण्या