सुरेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा  

वृत्त एकसत्ता न्यूज 

माळशिरस / प्रतिनिधी दिनांक 8/9/2026 :

चाकोरे  ग्रामपंचायत सदस्य  तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकोरे पंचक्रोशीत सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

त्यांचा वाढदिवस शिक्षक दिनी येत असल्यामुळे चाकोरे परिसरातील सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचे असलेले योगदान लक्षात घेऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.वाढदिवसानिमित्त ग्रामीण संस्कृती व पारंपरिक क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘चक्रेश्वर केसरी’ भव्य बैलगाडा शर्यतीचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला परिसरातील बैलगाडा शौकिन तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप, शिक्षकांचा सन्मान वृक्षारोपण आणि बैलगाडा शर्यत अशा विविध उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी, शिक्षणाला प्रोत्साहन आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देत  सुरेश  पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या विविधउपक्रमांबद्दल परिसरातील नागरिक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून  सुरेश पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.या विविध कार्यक्रमानिमित्त माढा लोकसभा खासदार  धैर्यशील  मोहिते पाटील,यय जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य विष्णुपंत नारनवर, पंचायत समिती सदस्य युवराज  झंजे, सहकार महर्षीचे संचालक लक्ष्मण  शिंदे, संजय पाटील, लक्ष्मण मेटकरी, मोहन गायकवाड, मारुती कुंभार, रामचंद्र कस्तुरे,चंद्रकांत शिंदे,नवनाथ जाधव, सचिन कचरे, हनुमंत शिंदे, सुरेश ननवरे,जोतीराम जाधव, तानाजी पाटील, विष्णू पाटील, महादेव माने, बापूराव कोळेकर, दत्तात्रय कदम, रघुनाथ शिंगटे, विनायक पाटील, अविनाश कदम, जितेंद्र गायकवाड, अक्षय कदम, सचिन माने उपस्थित होते. हा कार्यक्रम दादासो पाटील,विकी पाटील,नवनाथ पाटील,संतोष पाटील व सुरेश पाटील मित्र मंडळ यांनी यशस्वीरित्या पार पाडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या