"सहकार महर्षि" चा 65 व्या ऊस गळीत हंगामाचा रविवारी शुभारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/9/2026 :
"आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणित" सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा 65 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दिनांक 27/9/2026 रोजी सकाळी 11:10 वा. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच याच दिवशी सकाळी दहा वाजता डिस्टिलरी उत्पादन शुभारंभा निमित्त संचालक जयदीप शिवाजीराव एकतपुरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ शितल जयदीप एकतपुरे या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे सुचित केले आहे.

0 टिप्पण्या