"श्री शंकर" स. सा. कारखान्याची 59 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

 "श्री शंकर" स. सा. कारखान्याची 59 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/9/2026 :

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्याची 59 वी अधिमंडळाची 2025-26 या अर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा  खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.   प्रतिमा पूजन जेष्ठ सभासद पंढरीनाथ गुलाब मोहिते बांगार्डे यांचे हस्ते  करण्यात आले. 

            या सभेस महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार तथा श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, संचालक मंडळ, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी यांचेसह ऊस उत्पादक सभासद, अधिकारी, कर्मचारी, कारखाना कार्यक्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी  प्रास्ताविक केले, तर सभेचे अहवाल व विषय वाचन कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले. शेवटी  संचालक दत्तात्रय रणनवरे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या