राज्यातील 26 दिव्यांगांचा चारधाम यात्रेचा प्रारंभ

 

राज्यातील 26 दिव्यांगांचा चारधाम यात्रेचा प्रारंभ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

शिवुर्जा प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित दिव्यांगांच्या चारधाम दिव्य यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 28 सप्टेंबर ते दिनांक 12 ऑक्टोबर या दरम्यान उत्तराखंड राज्यातील देवभूमी असलेल्या हिमालय पर्वत रांगेतील गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ व बद्रीनाथ या चारधाम दिव्य यात्रेची धार्मिक सहल संपन्न होणार आहे.

हिमालय पर्वत पायथ्याला असलेल्या देवभूमी हरिद्वार व ऋषिकेश या ठिकाणी हे सर्व यात्रेकरू विविध धार्मिक मंदिरांना मठांना व पवित्र स्थळांना भेटी देऊन दर्शन घेणार आहेत..

महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी पहिल्यांदाच हिमालय पर्वत रांगेतील चार धाम दिव्य यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवाजी गाडे यांनी दिली. विशेष म्हणजे या दिव्यांगांच्या दिव्यात्रेमध्ये 13 महिला व 13 पुरुषांनी सहभाग घेतला आहे.

या संपूर्ण दिव्ययात्रेचा प्रवास हरिद्वार पर्यंत रेल्वे ने करणार असुन गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी स्वतंत्र ट्रॅव्हल्स बसची व्यवस्था करण्यात आली आहे. बारा दिवस चालणाऱ्या या दिव्या यात्रेतील सहभागी सर्व यात्रे करूंचा मुक्काम विविध ठिकाणी हॉटेल्स मध्ये करण्यात येणार असून दररोज शुद्ध आणि सात्विक महाराष्ट्रीयन भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी सदस्य पुढील प्रमाणे: 

1)शिवाजी गाडे 2) संगिता गाडे  (पैठण, छत्रपती संभाजीनगर), 3) छोटी चव्हाण नाशिक  4) राहुल अग्निहोत्री नाशिक 5) जयश्री किरण धायबर चाकण खेड पुणे 6) गणेश धानोकर 7) विद्या गणेश धानोकर  शेगांव बुलडाणा 8) राहुल अग्नीहोत्री नाशिक 9)सागर येवले लोणावळा 10) प्रताप पाटील भडगाव जळगाव 11) सुनिता प्रताप पाटील 12) गोविंद आप्पा डांगे 13) मंदाकिनी गोविंद डांगे पैठण छत्रपती संभाजीनगर 14)राजु झाकणे 15)वंदना राजु झाकणे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर 16) सखाराम बोरकर खेड पुणे 17) संजय पवार सातपुर नाशिक 18) जयश्री संजय पवार 19) पांडुरंग भंगाळे सातपुर नाशिक 20) नलिनी पांडुरंग भंगाळे 21) प्रियंका लाड/शिंदे सिन्नर नाशिक  22) गणेश धमाले सिन्नर नाशिक  23) अशोक रोडे पैठण छत्रपती संभाजीनगर 24)अरुणा रोडे 25) संगिता रोडे पैठण 26)विजया नरके

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या