🍀  रानभाजी - रुकाळू  🍀

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/9/2026 :

रुकाळू (रुखाळू) ही प्रामुख्याने पावसाळ्यात कोकणात आणि डोंगराळ भागातील जंगलांत कड्या-कपाऱ्यात नैसर्गिकरित्या उगवणारी एक दुर्मिळ रानभाजी नि औषधी वनस्पती आहे. याला अनेक ठिकाणी 'झाडावरचा अळू' किंवा 'लाल कंद' म्हणून ओळखले जाते. हा अळूचा प्रकार आंबा, वड, पिंपळ अशा झाडांच्या ढोलीत किंवा बुंध्यांवर वाढतो. याचे कंद लाल रंगाचे असतात आणि याची पाने सुरुवातीला हिरवी व नंतर हळूहळू थोडी लालसर होतात.

नेहमीच्या अळू प्रमाणेच याच्या कोवळ्या पानांची भाजी आणि वड्या केल्या जातात. याच्या वड्या अत्यंत चविष्ट व खमंग लागतात आणि विशेष म्हणजे हा अळू खाताना अजिबात घशात खाज सुटत नाही. याचे देठ आणि कंदही खाण्यायोग्य असतात. ही वनस्पती अत्यंत गुणकारी मानली जाते. मुळव्याधाच्या त्रासावर याचे कंद उगाळून लावले जातात. तसेच, शरीरातील हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी याची पाने फायदेशीर ठरतात. पूर्वी ही वनस्पती केवळ जंगलातच पाहायला मिळायची, पण आता अनेक जण याचे कंद आणून घरच्या कुंडीत किंवा परसबागेत याची लागवड करतात.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

=====================


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या