विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/9/2026

गणेशोत्सवाच्या मंडळात सध्या तुम्हा बाल कार्यकर्त्यांची आनंदाने मोठी धावपळ सुरू असेल! मंडळात मोठे काका आणि दादा सांगतील ती छोटी-मोठी कामे तुम्ही उत्साहाने करत असाल; यातूनच जीवनात अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात.

अशा समाजकार्यातूनच तुमच्यातील अंगभूत नेतृत्वगुण वाढीस लागतात; सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे आणि संयमाने कसे बोलावे हे समजते. अर्थातच या सर्व गोष्टींमध्ये शिस्त आणि नीतिमत्ता जपली पाहिजे, हे इथे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

मुलांनो, शेजारच्या इतर मंडळांशी नेहमी सकारात्मक आणि निकोप स्पर्धा करा; त्यांच्यातील चांगल्या उपक्रमांचे अनुकरण करा. स्पर्धा निरोगी असावी; त्यात कोणताही द्वेष, ईर्ष्या किंवा केवळ वरचढपणा दाखवण्याची संकुचित तुलना नसावी. अधिक चांगले कार्य काय व कसे करता येईल, यासाठीच नेहमी प्रयत्नशील राहा.

आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठीच हे सार्वजनिक उत्सव असतात!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या