✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.


 ✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/8/2026 :

एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावला.

नाती अशी असावी की ज्यावर नेहमी अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता, तेवढाच आज असावा. नातं ते नाही की जे सुख-दुःखात सोबत राहतं. नातं तेच असतं जे नेहमी आपलेपणाची जाणीव करून देतं.

गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो. कारण काही मिनीटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो.

म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.

स्वत:च्या मनगटावर विश्वास असणा-याला दुस-याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करीत नाही.

निसर्ग कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात.

गरज असेल तेव्हाच लोक विचारतात, नाहीतर आपलं अस्तित्वही विसरतात. मनापासून जपलं तरी कदर कुणाला नसते, हेच आयुष्याचं वास्तव आहे.

कधी कधी शांत राहणं म्हणजे हार नव्हे, तर आत्मसन्मानाचं जतन असतं. कारण काही लढाया शब्दांनी नव्हे, तर शांततेने जिंकल्या जातात.

जीवन हे एकदाच मिळते. त्यामुळे दुसर्‍यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका. त्या ऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखुन ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा.

माणसाने घराबाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही.

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

    ▬ஜ۩۞۩ஜ▬

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या