हरिद्वार उत्तराखंड येथील शेरगिरी महाराज (नागा बाबा) यांची सदिच्छा भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे अकलूज दिनांक 8/8/2026 :
श्री श्री 1008 अनंत श्री विभूषित महामंडलेश्वर पूज्य श्री स्वामी चिन्कीनंद गिरी जी महाराज पंचायती श्री निरंजनी आखाडा (हरिद्वार )चे शेरगिरी महाराज (नागा बाबा) यांनी शनिवार दिनांक 8/8/2026 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या अकलूज येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
अध्यात्मिक स्वरूपाच्या भेटीवर आलेले नागा बाबा तसेच त्यांच्या शिष्यांचा सन्मान तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे, कौस्तुभ गिरीश शेटे, कालिदास कुंभार, गोपाळ राऊत, महादेव साठे, इत्यादी उपस्थित होते.


0 टिप्पण्या