✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/8/2026 :
*चुका होत जातील, सुधारत जा,*
*वाटा सापडत जातील, शोधत जा,*
*माणसं बदलत जातील, स्वीकारत जा,*
*परिस्थिती शिकवत जाईल, शिकत जा,*
*येणारे दिवस निघून जातील, क्षण जपत जा,*
*विश्वास तोडून अनेक जण जातील, स्वतःला सावरत जा,*
*प्रसंग परीक्षा घेत जाईल, क्षमता दाखवत जा,*
*आपल्याकडे आहे त्याच्यात आनंदी राहणे ज्याला जमले, ती व्यक्ती खरी श्रीमंत आहे. सगळ असुन सुद्धा नेहमी रडणारे गरीब नसुन वैचारिक दरिद्री आहेत.*
*एकशे आठ मण्यांची माळ जपताना मन भटकत राहातं. पण शंभरच्या नोटांचं बंडल मोजताना मन एकाग्र राहातं. विचार करा की, नेमकी अडचण कुठं आहे, मणी की मनी,*
*कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, कारण प्रत्येकाची स्वतःची एक दुनिया असते. कोणी कितीही आपलं असलं तरी, प्रत्येकजण आधी स्वतःचाच विचार करतो.*
*आपण कितीही बरोबर असलो तरी, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देऊन आपलाच त्रास वाढतो. म्हणून अनेकदा शांत बसून निरीक्षण करायला शिकणे हीच सुखाची गुरूकिल्ली आहे,
हुशारी करा, चलाखी करा, फसवा किंवा वाईट करा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वरचा हिशोब ठेवणारा कधीच झोपत नाही. कर्म कधीच माफ करत नाही. ते फक्त वेळ बघतं. आज तुम्ही जे पेरताय, उद्या तेच तुमच्यावर दुप्पट ताकदीने परत येणार आहे. म्हणून माणसं जोडा, मनं जिंका. कारण जेव्हा कर्माची थाप पडते, तेव्हा तिचा आवाज अख्खं आयुष्य हादरवून टाकतो. ती थाप दुसरं तिसरं काही नसून, तुमच्याच कर्माचा परतावा असतो.
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
✒️संकलन : प्रविण सरवदे कराड

0 टिप्पण्या