✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार !


 ✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार ! 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/8/2026 :

व्यक्ती कितीही आपल्या बुद्धिमत्तेनुसार किंवा चातुर्याने जीवन जगत असला, तरी नियतीने ठरवून दिलेले यश, अपयश, संकटे त्याला स्विकाराविच लागतात,*

बदला घेण्याची गरज नाही, फक्त धीर धरा. चिखल समजुन अंतर ठेवा व क्षुल्लक समजुन त्याकडे दुर्लक्ष करा.,

जो करेल त्याला तेच मिळेल फक्त वेळ येवु द्या.

दुसऱ्याला वेड्यात काढून स्वतःला खूप शहाणं समजायचं नसतं, वजीर कधी काय चाल चालून जाईल हे राजाला पण माहित नसतं,

गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत.

संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा. त्याला घ्यायला जायची गरज नसते.

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तत्त्वज्ञान वेगळ असत. कोणी कस वागायच, तर कोणी कस जगायच हे शिकवत. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो, त्या प्रत्येकामागे काही हेतू असतो. काही लोक आपल्याच आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात, तर काहीजण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काहीजण नुसता आपला वापर करून घेतात, तर काही विशेष लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व बनवण्यासाठी कारणीभूत ठरतात.

जर कोणी तुमच्या जवळ मनातल्या भावना व्यक्त करत असेल तर, स्वतःला नशीबवान समजा. कारण माणसं त्यांच्याशीच मनमोकळेपणाने बोलतात, ज्यांना ते आपलं मानतात.

मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे, हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.

कोळशात हिरा असेल तर चालेल पण, हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तर चालेल पण बोटीत पाणी नसावे. त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल पण मैत्रीत राजकारण नसावे.    

✍️ प्रा. एस. एम. पाटील

देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

‼️🌹🌹‼️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या