✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार

 


✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/8/2026 :

मनासारखे दिवस पाहण्यासाठी मना विरूध्द घडणारे दिवस सोसावे लागतात.

कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते.

जिथे सर्व संपले याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगत पडणारा हात, देवापेक्षा कमी नसतो.

आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते.आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो.

आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते. आणि आपुलकीची साथ मिळाल्याने माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही.

सत्य सांगण्या साठी कुणाच्याही शपथेची गरज नसते.

नदीला वाहण्या साठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते.

जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्या साठी कुठल्याही रथाची गरज नसते.

कोणाच्या प्रभावात जगू नका, आणि कोणाच्या आभावात जगू नका.

हे जीवन तुमच्या स्वतःचे आहे, म्हणून तुमच्या स्वभावानुसार रुबाबात जगा कारण प्रेम बालपणी फुकट मिळते तरुणपणी कमवावं लागतं आणि म्हातारपणी मागावं लागतं.

रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते. मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते.

हसतमुख लोकांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो. काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत, प्रफुल्लीत तथा उल्हासीत होतेच होते.

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या