✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार



✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार
        
वृत्त एकसत्ता न्यूज 
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 
अकलूज दिनांक 6/8/2026 :
अक्षर कितीही सुरेख असले तरी खाडाखोड झालेल्या शब्दांकडे जसे पहिले लक्ष जाते. तसेच माणसाचे गुण कितीही चांगले असले तरी त्याची एक लहान चूक सुद्धा पहिली दिसते.
म्हणून नेहमी चांगल्या गुणांकडेच लक्ष द्यावे. जेणेकरुन संबंध चांगले राहतील,
देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो, पैसा असो, प्रसिद्धी असो, जिव्हाळा असो किंवा वेळ, जमवणं सोपं असतं आणि जपणं कठीण असत,
लोकांच्या वागण्यावर आपल सुख अवलंबून नसाव.
ज्याला कोणाकडूनही काही अपेक्षाच नाही, तो खरा या जगात सुखी.
म्हणून आपल्या सुखाची चावी आपण कधीच दुसऱ्यांच्या हातात देऊ नये,
झिजून गेलं तरी चालेल पण गंजून जाऊ नये. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य. जो झिजतो तोच चमकतो.
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.
समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून,
जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे,
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड, 
≈===================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या